कोडोली हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
कोडोली हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
कार्वे प्रतिनिधी :-
कोडोली ता. कराड येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाले मध्ये वार्षिक पारितोषिक व विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी विठ्ठल पाटील होते .तर प्रमुख पाहुणे ए. एस साळुंखे सर माजी मुख्याध्यापक यशवंत हायस्कूल कराड हे होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम भारती विद्यापीठचे संस्थापक डॉ.पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. तसेच प्रशालेतील इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक आय.जे.मोरे सरांनी भारतीय विद्यापीठाचे गौरव गीताचे गायन केले. या कार्यक्रम प्रसंगी विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व शालेय उपयोगी भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध देशभक्तीपर गीते,नाटीका,नृत्य,हास्यविनोद सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाची प्रास्ताविका शाळेचे मुख्याध्यापक के.पी.तरवारे सर यांनी केले. तर परीक्षा विभागाची प्रशस्तीपत्रकाचे वाचन आय.जे.मोरे सर यांनी केले. तसेच क्रीडा विभागाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे वाचन एस. ए. संदे मॅडम व व्ही.ए.जाधव मॅडम यांनी केले. तर आभार एस.ए.आबी सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य प्रशालेचे लिपिक वीरेंद्र पाटील व कर्मचारी बाबा नगर यांचे लाभले.
या कार्यक्रमास कोडोली गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील सुधाकर जगताप भारती विद्यापीठचे सेवक अमोल मोरे शाळेचे मुख्याध्यापक के. पी.तरवारे सर सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment