कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगावं येथे व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगावं येथे व्याख्यान संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मूल्य व पर्यावरणाचे संवर्धन व्यक्तिमत्व विकास यावरती व्याख्यान पार पडले.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्या शिक्षणाची खरे महत्त्व काय व ते कधी सिद्ध होते तसेच शिक्षण घेतले आहे तर त्याबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक, आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच कायद्यानुसार आपण व्यक्ती म्हणून कसे असले पाहिजे पर्यावरणाचे संवर्धन कसे केले पाहिजे हे या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री शिवाजी नेर्ली यांनी सांगितले. या कार्यक्रमा वेळी संस्थेच्या वतीने मा. प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी नेर्ली यांचे स्वागत केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोनिका चवरे यांनी केले तर आभार प्रा. श्रद्धा वैद्य यांनी मानले.

Comments
Post a Comment