द. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

 द. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

शिराळा - प्रतिनिधी.

      आरळा ता.शिराळा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या शिराळा तालुक्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. शिराळा तालुक्यामध्ये धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने कार्यक्रमाची आखणी तयार केलेली आहे.  उन्हाळी सुट्टीमध्ये भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमाचे नियोजन केले असून शिराळा तालुक्यातील बौद्ध बंधू भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावयाचा आहे. 

  धम्म वाढीसाठी लागणारे कार्यक्रम शिराळा तालुक्यात जोमाने राबवणे त्याकरिता येत्या गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी शिराळा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन धम्म बांधवांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत या बैठकीसाठी जगन्नाथ परुले , एम एच परुले , जगन्नाथ झाडे , बुधाजी झाडे , सुरेश कांबळे , डॉ. विनोद झाडे , डॉ.संदीप कांबळे , प्रदीप बनसोडे रोहित वाघमारे ,ज्ञानू कांबळे , शशिकांत कांबळे , दीपक कांबळे रमाकांत मोहिते , गौतम कांबळे , तुषार कांबळे  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .