कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं येथे इंडक्शन प्रोग्राम संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं येथे इंडक्शन प्रोग्राम  संपन्न.

उंडाळे- प्रतिनिधी. 

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक मीटिंग आयोजित करण्यात आली होती.

यावेळी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना फार्मसी म्हणजे काय तसेच फार्मसीच्या परीक्षेचे स्वरूप काय असते, विषय कोणते कोणते असतात व फार्मसी नंतर कुठल्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आहेत व आपल्या पाल्याची प्रगती काय आहे हे समजावे यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी डिप्लोमा प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना फार्मसी बद्दल सविस्तर माहिती दिली तसेच संस्थेचे ध्येय, उद्दिष्टे समजावून सांगितली. त्याचबरोबर पालकांच्या शंकांचे निरसन देखील केले.

त्याचबरोबर प्रथम वर्षातील इंडक्शन प्रोग्राम देखील पार पडला यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या पाटील मॅडम यांनी महाविद्यालयातील प्रॅक्टिकल लॅब, क्लासेस मशीन रूम, सर्व सुविधा, शिक्षक विषय परीक्षांचे स्वरूप फार्मसी क्षेत्राची गरज व संधी कुठे कुठे  आहेत ते सविस्तरपणे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगतीसाठी काय काय केले पाहिजे व महाविद्यालयांमध्ये काय काय उपक्रम राबवले जातात तसेच विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धासाठी पण विद्यार्थ्यांना तयार केले जाते या सर्व गोष्टी इंडक्शन प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना सांगितल्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रद्धा वैद्य यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पूजा भोसले यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .