Posts

Showing posts from May, 2023

नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.

Image
  नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट - नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी उद्घाटन झाले आणि पंतप्रधानांनी लोकशाहीचे हे मंदिर भारतवासियांना अर्पण केले. पूजा, होमहवन, मंत्रोच्चार, सेंगोल तथा राजदंडाची प्रतिष्ठापना नंतर नव्या संसद भवनाच्या कोनशिलेचे अनावरण अशा भव्य स्वरूपात संसद भवनाचे उद्घाटन पार पडले. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यावेळी उपस्थित होते. अत्यंत शानदार अशा या सोहळ्याला सकाळी ७.१५ वाजता प्रारंभ झाला. साधूसंतांच्या वैदिक मंत्रोच्चारात कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या परिसरता मंगल सूर निनादत होते. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत तिथे प्रथम पूजा विधी पार पडले. त्यानंतर पंतप्रधानांनी सेंगोल तथा राजदंडाचे दर्शन घेतले.  संतांनी हा राजदंड पंतप्रधानांच्या हाती सोपविला आणि नंतर त्यांच्यावर मंत्रोच्चारात फुले टाकली, आशीर्वाद दिले. मग पंतप्रधानांनी हा राजदंड घेऊन लोकसभेतील लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी असलेल्या जागेत त्याची प्रतिष्ठापना केली. त्याला वंदन केले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी कोन...

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

Image
  पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.        _____जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी. सातारा दि. 28 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि.23 जून 2023  या कालावधीत सातारा जिल्हयामधुन मार्गक्रमण करणार आहे. हा  सोहळा शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधाचे  नियोजन करुन  हा आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.       सातारा जिल्हयातील निरा नदी ते साधुबुवाचा ओढा या पालखी मार्गाची, पालखी मार्गावरील विसावा, दुपारचे भोजन स्थळ, पालखी तळ याचा पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  ज्ञानेश्वर खिलारी , पोलीस अधिक्षक समीर शेख,राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे संजय कदम आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. जयवंशी म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक...

डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड.

Image
डॉ.बाळकृष्ण  दामले यांची संचालक पदी निवड.   कराड : प्रतिनिधी  पुणे येथील  डॉ. बाळकृष्ण दिगंबर दामले यांची कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा हॉस्पिटल कराड येथे 'संचालक, डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन'या पदावर निवड झाली आहे. ते फुलब्राईट स्कॉलर (अमेरिका) असून त्यांनी सिरॅक्युज युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथून टेलिव्हिजन,रेडियो आणि फिल्म या विषयात एम.एस. केले आहे. मुंबई येथील देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज येथे फाउंडर प्रिन्सिपल/डीन म्हणूनही काम केले आहे.शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, येथे अनेक कार्यक्रमांची निर्मिती व संशोधन केले आहे. त्यांना त्याबद्दल अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सध्या त्यांनी वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रथमच ऑडिओ व्हिज्युअल टेक्नॉलॉजी चा वापर करण्याचे काम सुरू केले आहे.

दीपक लोखंडे सारख्या उमद्या तरुणाने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली .

Image
  दीपक लोखंडे सारख्या उमद्या तरुणाने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली . _______उदयसिंह पाटील उंडाळकर.          उंडाळे - प्रतिनिधी . येवती ता. येथील चंद्रभागा रुरल  डेव्हलपरचे दीपक लोखंडे यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे, असे मत रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केले .ते कराड येथील  यशवंतराव चव्हाण स्मृति  सदन टाऊन हॉल येथे चंद्रभागा रुरल डेव्हलपर च्या वतीने घेण्यात आलेल्या  पुरस्कार  वितरण  समारंभ प्रसंगी बोलत होते . यावेळी भूमाता ब्रिगेड तृप्ती ताई देसाई,  सिने अभिनेत्री सुरेखा कुडची, सिने अभिनेत्री सुनंदा शेंडे, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील , चंद्रभागा रुरल  डेव्हलपरच्या अपर्णा लोखंडे    उपस्थित होत्या. यावेळी हा पुरस्कार सोहळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र संघटक ज्ञानेश्वर शेवाळे व चंद्रभागा रुरल डेव्हलपरचे दीपक शेठ लोखंडे यांचा संयुक्तरित्या  नागरिक सत्कार करण्...

बाळकृष्ण मोरे यांचे निधन .

Image
  बाळकृष्ण मोरे यांचे निधन . उंडाळे - प्रतिनिधी. येवती हणमंतवाडी ता. कराड येथील ज्येष्ठ नागरिक  माजी पोस्टमास्तर बाळकृष्ण बापू मोरे  यांचे शुक्रवार दिनांक २६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोरे यांचे ते वडील होते रक्षा विसर्जन रविवार दिनांक 28 रोजी हनुमंतवाडी येथे नऊ वाजता होणार आहे .

बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी.

Image
  बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी. गोंडवाना न्यूज रीपोर्ट -   फेब्रुवारी-2023 मध्ये पार पडलेल्या 12 वीच्या परीक्षेत  राज्याचा निकाल 91.25 इतके टक्के लागला आहे.या निकालात मुलींनी  बाजी मारल्याचं दिसतंय. 17 नंबरचा फॉर्म भरुन खासगीरित्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल 82.39 टक्के इतका लागलेला आहे. गेल्या वर्षीपेक्षा 2.97 टक्क्यांनी निकाल घटला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला.तर दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली. मुलींची बाजी - 93.73 मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण - 89.14 राज्यात एकूण विद्यार्थी - 14,16,371 उत्तीर्ण - 12,92,000 मराठीसह सहा भाषांच्या माध्यमांतून परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं 12 वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  विभागनिहाय निकाल. कोकण - सर्वाधिक निकाल 96.01 सर्वात कमी निकाल मुंबई- 88.13 औरंगाबाद निकाल - ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे निरोप व शुभेच्छा समारंभ संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे निरोप व शुभेच्छा समारंभ संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयामध्ये दरवर्षी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षण किंवा व्यवसाय हे दोन महत्त्वाचे टप्पे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये चालू होतात म्हणून यावेळचा समारंभ हा फक्त निरोप समारंभ नसून शुभेच्छा समारंभ होता. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महाविद्यालय सतत वेगवेगळे प्रयत्न करत असते. तसेच यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी समारंभावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांनी विविध टप्प्यावर शिकत राहिले पाहिजे व्यावसायिक दृष्ट्या सतत तत्पर राहिले पाहिजे असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले. यावेळी इतरही सर्व शिक्षक वर्ग य...

पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव - राज्यपाल रमेश बैस

Image
  पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव - राज्यपाल रमेश बैस सातारा दि. २२ - महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली.         महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल श्री. बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख,  भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनिता भिलारे,  सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.        पुस्तकांचे गाव भिलार पहायला मिळाले हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. आजकालच्या इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे....

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्या काम करत असलेल्या क्षेत्राविषयी व कार्याविषयी मार्गदर्शन केले. व महाविद्यालयात शिक्षण घेत असताना स्वतःचे महाविद्यालयातील अनुभव सांगितले. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच हर्षाली लादे, सोनाली डुबल हर्षल दरवदे, आनंद धुमाळ, पूजा कारंडे, मुस्कान देसाई या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिप्ती पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

भारत विद्यामंदिर चे NMMS शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये यश.

Image
  भारत विद्यामंदिर चे NMMS शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये यश. कराड- प्रतिनिधी                  भारत विद्या मंदिर संभाजीनगर सातारा मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केले. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सूर्यकांत शिगम(जिल्ह्यात प्रथम) व अंजली काटकर या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली. तसेच छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी विद्यालयातील ढाणे आर्यन, जगदाळे वैष्णवी, भोईटे आर्यन, घळके ज्योती, महाडिक स्नेहा, निंबाळकर प्रणव, साळुंखे उत्कर्ष, कणसे ओम, भोसले वेदांत, सरोळकर ऋतुजा, कोडलिंगे ओंकार हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा.अँड. कु.सीमा दिवाकर भोरे मॅडम, उपाध्यक्ष मा.कु.शोभा द्रविड मॅडम, संस्थेच्या सचिव तथा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. अनुपमा दिवाकर भोरे मॅडम, संचालक मंडळ, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. अतुल भोरे सर, पर्यवेक्षक शाहूराज मुळीक सर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.यशस्व...

युवकांनी रोजगार देणारे बनावे: उद्योगमंत्री उदय सामंत.

Image
युवकांनी रोजगार देणारे बनावे: उद्योगमंत्री उदय सामंत. सातारा दि. 20:  युवकांनी रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे. यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.  जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवारामार्फत यशोदा टेक्नीकल कॅम्पस, वाढे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उद्योगमंत्री श्री. सामंत बोलत होते.  यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, यशोदा टेक्नीकलचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे आदी उपस्थित होते.     सामान्य कुटुंबातील युवकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगून ...

नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे.

Image
  नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे.                                                                                          ________ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी. सातारा दि. 19 : सातारा जिल्ह्यातील ज्या नागरिकांची आधार कार्ड तयार होऊन दहा वर्ष पूर्ण झाली आहेत अशा नागरिकांनी आपल्या आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आधार विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.  सातारा जिल्ह्यामध्ये आधार अद्ययावतीकरण करण्याची मोहिम वेगवान करण्यासाठी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी याबाबत वेळोवेळी आढावा घेत आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत वितरीत केलेल्या 93 आणि महिला व बालविकास विभागाच्या 56 आधार केंद्र चालकांचा आढावा घेण्यात आल...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं येथे व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं येथे  व्याख्यान संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी.  श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव. येथे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनासाठीश्री प्रसाद भागवत यांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले. यावेळी श्री प्रसाद भागवत यांनी महाविद्यालयातील कामांचा ताण कसा कमी करता येईल, आपल्या दैनंदिन कामातील आत्मविश्वास, गुणवत्ता व कार्यक्षमता कशी वाढवता येईल. तसेच महाविद्यालयातील संघटित कामाचे फायदे काय होतात, वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर त्याचे फायदे काय काय होतात अशा विविध विषयावरती शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होता.