बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी.
बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी.
गोंडवाना न्यूज रीपोर्ट - फेब्रुवारी-2023 मध्ये पार पडलेल्या 12 वीच्या परीक्षेत राज्याचा निकाल 91.25 इतके टक्के लागला आहे.या निकालात मुलींनी बाजी मारल्याचं दिसतंय. 17 नंबरचा फॉर्म भरुन खासगीरित्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल 82.39 टक्के इतका लागलेला आहे. गेल्या वर्षीपेक्षा 2.97 टक्क्यांनी निकाल घटला.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला.तर दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली.
मराठीसह सहा भाषांच्या माध्यमांतून परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं 12 वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विभागनिहाय निकाल.
कोकण - सर्वाधिक निकाल 96.01
सर्वात कमी निकाल मुंबई- 88.13
औरंगाबाद निकाल - 91.85
कोल्हापूर निकाल - 93.28
अमरावती निकाल - 92.95

Comments
Post a Comment