कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्या काम करत असलेल्या क्षेत्राविषयी व कार्याविषयी मार्गदर्शन केले. व महाविद्यालयात शिक्षण घेत असताना स्वतःचे महाविद्यालयातील अनुभव सांगितले. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच हर्षाली लादे, सोनाली डुबल हर्षल दरवदे, आनंद धुमाळ, पूजा कारंडे, मुस्कान देसाई या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिप्ती पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment