कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे निरोप व शुभेच्छा समारंभ संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे निरोप व शुभेच्छा समारंभ संपन्न.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयामध्ये दरवर्षी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षण किंवा व्यवसाय हे दोन महत्त्वाचे टप्पे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये चालू होतात म्हणून यावेळचा समारंभ हा फक्त निरोप समारंभ नसून शुभेच्छा समारंभ होता. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महाविद्यालय सतत वेगवेगळे प्रयत्न करत असते. तसेच यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी समारंभावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांनी विविध टप्प्यावर शिकत राहिले पाहिजे व्यावसायिक दृष्ट्या सतत तत्पर राहिले पाहिजे असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले. यावेळी इतरही सर्व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विशेष गुणवंत विद्यार्थी म्हणून द्वितीय वर्षातील अक्षदा बेंगडे  या विद्यार्थिनीला पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाशिष कोंडेदेशमुख व सानिया चंद्रगडी  व आभार ओम करपे व गायत्री कुटे यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .