भारत विद्यामंदिर चे NMMS शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये यश.
भारत विद्यामंदिर चे NMMS शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये यश.
कराड- प्रतिनिधी
भारत विद्या मंदिर संभाजीनगर सातारा मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केले. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सूर्यकांत शिगम(जिल्ह्यात प्रथम) व अंजली काटकर या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली. तसेच छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी विद्यालयातील ढाणे आर्यन, जगदाळे वैष्णवी, भोईटे आर्यन, घळके ज्योती, महाडिक स्नेहा, निंबाळकर प्रणव, साळुंखे उत्कर्ष, कणसे ओम, भोसले वेदांत, सरोळकर ऋतुजा, कोडलिंगे ओंकार हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा.अँड. कु.सीमा दिवाकर भोरे मॅडम, उपाध्यक्ष मा.कु.शोभा द्रविड मॅडम, संस्थेच्या सचिव तथा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. अनुपमा दिवाकर भोरे मॅडम, संचालक मंडळ, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. अतुल भोरे सर, पर्यवेक्षक शाहूराज मुळीक सर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.यशस्वी विद्यार्थ्यांना श्री संतोष ढाणे, प्रशांत भोसले संतोष मोरे सर यांनी मार्गदर्शन केले.

Comments
Post a Comment