दीपक लोखंडे सारख्या उमद्या तरुणाने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली .
दीपक लोखंडे सारख्या उमद्या तरुणाने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली .
_______उदयसिंह पाटील उंडाळकर.
उंडाळे - प्रतिनिधी .
येवती ता. येथील चंद्रभागा रुरल डेव्हलपरचे दीपक लोखंडे यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे, असे मत रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केले .ते कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदन टाऊन हॉल येथे चंद्रभागा रुरल डेव्हलपर च्या वतीने घेण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते . यावेळी भूमाता ब्रिगेड तृप्ती ताई देसाई, सिने अभिनेत्री सुरेखा कुडची, सिने अभिनेत्री सुनंदा शेंडे, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील , चंद्रभागा रुरल डेव्हलपरच्या अपर्णा लोखंडे उपस्थित होत्या. यावेळी हा पुरस्कार सोहळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र संघटक ज्ञानेश्वर शेवाळे व चंद्रभागा रुरल डेव्हलपरचे दीपक शेठ लोखंडे यांचा संयुक्तरित्या नागरिक सत्कार करण्यात आला.

Comments
Post a Comment