Posts

Showing posts from April, 2024

राजकीय पक्ष व उमेदवार,नेते यांनी व्यसनाविरोधी प्रचार प्रबोधनाची भूमिका घेऊन कृती करण्याची गरज.

Image
  राजकीय पक्ष व उमेदवार,नेते यांनी व्यसनाविरोधी प्रचार प्रबोधनाची  भूमिका घेऊन कृती करण्याची गरज. "दारूबंदी कृती समिती शिराळा तालुका अध्यक्ष पोपट बनसोडे असे आवाहन." शिराळा - प्रतिनिधी. महाराष्ट्र मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहे यातूनच ढाबा संस्कृती वाढलेली दिसून येते.  यामुळे सामाजिक अवनती होते असं प्रतिपादन दारूबंदी कृती समिती शिराळा तालुका अध्यक्ष मा. पोपट बनसोडे यांनी केलंय. दारू,मटण, पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराला मत देऊ नका.आमच्या आया बहिणीचे उध्वस्त करणारे  संसार व तरुण पिढीला व्यसनाच्या नादी लावणाऱ्या उमेदवाराला आपले मत देऊ नका  निवडणुकीच्या काळात जनतेला दारूच्या नशेत ठेवून त्यांच्याकडून मते मिळवली जातात. अनेकांना निवडणूक प्रचार काळात दारूचे व्यसन लागते अशा पदार्थाची निर्मिती व वितरण आणि विक्री यावर सरकारचे नियंत्रण नाही, कायदे ,नियम तोडून दिवसेंदिवस व्यसनाचा विळखा वाढतच आहे. यामुळे आरोग्याचे प्रश्न, शोषण,गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अपघात आणि बेकायदेशीर बाबी व्यसनातून निर्माण होत आहे...

कोडोली हायस्कूल मध्ये उन्हाळी छंद वर्ग शिबिराचे आयोजन.

Image
  कोडोली हायस्कूल मध्ये उन्हाळी छंद वर्ग शिबिराचे आयोजन. कार्वे - प्रतिनिधी. भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाले मध्ये उन्हाळी छंद वर्गाचे उत्साहात सुरुवात झाली. छंद वर्गाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.यादव पी. पी.यांनी केले. तसेच प्रशिक्षक महेश जगताप सर  यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्व: संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाचे धडे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकसह देण्यात आले. यावेळी प्रशालेचे सहशिक्षक मोरे आय. जे. यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम व आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संदे एस. ए. यांनी केले. प्रस्ताविक प्रशालेतील सहशिक्षिका सौ. जाधव व्ही.ए. यांनी केले. तर  आभार प्रशालेचे सहशिक्षक  श्री. आंबे सर यांनी व्यक्त केले. या शिबीरास प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

यसाबाई अंतू लोखंडे यांचे निधन.

Image
  यसाबाई अंतू लोखंडे यांचे निधन. शिराळा- प्रतिनिधी. यसाबाई अंतू लोखंडे यांचे  17/04/ 2024 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.समाजसेवक प्रकाश लोंखडे यांच्या आई होत. त्यांचे पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  रक्षाविसर्जन रविवार दि.21/04/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता सोनवडे ता.शिराळा,जि.सांगली येथे होईल.

कराड दक्षिणमधील साळशिरंबे गावात मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांचा संपर्क दौरा संपन्न.

Image
  कराड दक्षिणमधील साळशिरंबे गावात मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांचा संपर्क दौरा संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणमधील साळशिरंबे या गावामध्ये मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांचा संपर्क दौरा संपन्न झाला. यावेळी भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार खासदार छत्रपती मा.श्री.उदयनराजे भोसले  यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमासाठी, सातारा लोकसभा प्रमुख मा.डॉ.अतुलबाबा भोसले, कराडचे माजी नगरसेवक मा.सुहास जगताप, भाजपा कराड द. युवा मोर्चा अध्यक्ष मा.सूरज शेवाळे, मा.वसीम मुल्ला, साळशिरंबे गावच्या सरपंच सौ.प्रमिला कुंभार ,माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मा.हिंदुराव पाटील , मा.श्री.पंकज पाटील, माजी उपरपंच मा.जयवंतराव यादव, माजी उपरपंच मा.वसंतराव मोहिते, सुभेदार मा.दादू जाधव, श्री.विकास पाटील, पै.श्री.निवास यादव, सोसायटी माजी चेरमन श्री.सदाशिव पाटील, श्री.जयवंत पाटील, श्री.भानुदास पाटील, श्री.विनोद कांबळे, श्री.राजेंद्र पाटील, श्री.विलास चवरे, श्री.शरद साळुंखे, श्री.बबलू गावडे, श्री.अबासो शेंडगे, श्री.शंकर चवरे, श्री.आबासो थोरात, श...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती इंगरूळ ता.शिराळा येथे उत्साहात साजरी.

Image
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती इंगरूळ ता.शिराळा येथे उत्साहात साजरी. शिराळा - प्रतिनिधी  शिराळा तालुक्यातील इंगरूळ या गावी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच अभिजीत पाटील ,ग्रामसेवक बी .एन पाटील ,उपसरपंच विकास यादव  ,ग्रा .प .सदस्य सुर्यकांत माने .,धनाजी ढोले, ग्रमपंचायत सदस्य ,मनीषा माळी  ग्रमपंचायत सदस्य साधना कांबळे , तसेच विकास पाटील ,राहुल यादव, गजानन ढोले उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये 'ट्रेड फेअर डे' उत्साहात.

Image
  छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये 'ट्रेड फेअर डे' उत्साहात. तरुणाईंने घेतला व्यापार- व्यवसाय करण्याचा अनुभव. सातारा - प्रतिनिधी.          येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये व्यापार जत्रा अर्थात 'ट्रेड फेअर डे' उत्साहात संपन्न झाला. या ट्रेड फेअर डे चे उद् घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  राजेंद्र मोरे यांनी केले. डॉ. मोरे यांनी सर्व स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. तसेच व्यवसायात धाडसाने उतरणे व स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये प्राप्त करण्यासाठी या ट्रेड फेअर डे मधील अनुभव उपयोगी पडतील असा आशावाद व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील कौशल विकास विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भविष्यात स्वतःचा उद्योग - व्यवसाय , स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी  आवश्यक असणारी कौशल्ये देण्याच्या उद्देशाने   'ट्रेड फेअर डे' चे आयोजन करण्यात आले होते.  दुपारी उद् यनराजे भोसले महाराज साहेब यांनी 'ट्रेड फेअर डे' ला भेट देऊन सहभागींचा उत्साह वाढवला.        या 'ट...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे हर्टफुलनेस मेडिटेशन प्रोग्रॅम उत्साहात संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे हर्टफुलनेस मेडिटेशन प्रोग्रॅम उत्साहात संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये बऱ्याच लोकांचे आरोग्याकडे फार दुर्लक्ष होत असते. पण थोडा वेळ काढून ध्यान करणे व स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे आहे. या गोष्टी लक्षात घेता श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयात नुकतेच  संस्थेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांच्यासाठी तिन दिवसीय हर्टफुलनेस  मेडिटेशन प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी डॉ. अंजली शिंदे या प्रशिक्षक म्हणून उपस्थित होत्या त्या सध्या प्राध्यापिका म्हणून फार्माकोलॉजी डिपार्टमेंट कृष्णा विश्व विद्यापीठ कराड येथे कार्यरत आहे. तसेच त्यांच्या समवेत सविता पवार याही उपस्थितीत होत्या. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, पुष्पा पाटील, सुप्रिया पाटील याही यावेळी उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ...