कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे हर्टफुलनेस मेडिटेशन प्रोग्रॅम उत्साहात संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे हर्टफुलनेस मेडिटेशन प्रोग्रॅम उत्साहात संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये बऱ्याच लोकांचे आरोग्याकडे फार दुर्लक्ष होत असते. पण थोडा वेळ काढून ध्यान करणे व स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे आहे. या गोष्टी लक्षात घेता श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयात नुकतेच संस्थेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी तिन दिवसीय हर्टफुलनेस मेडिटेशन प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी डॉ. अंजली शिंदे या प्रशिक्षक म्हणून उपस्थित होत्या त्या सध्या प्राध्यापिका म्हणून फार्माकोलॉजी डिपार्टमेंट कृष्णा विश्व विद्यापीठ कराड येथे कार्यरत आहे. तसेच त्यांच्या समवेत सविता पवार याही उपस्थितीत होत्या.
यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, पुष्पा पाटील, सुप्रिया पाटील याही यावेळी उपस्थित होत्या.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. प्रियांका माळी यांनी मानले.

Comments
Post a Comment