छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये 'ट्रेड फेअर डे' उत्साहात.

 छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये 'ट्रेड फेअर डे' उत्साहात.

तरुणाईंने घेतला व्यापार- व्यवसाय करण्याचा अनुभव.


सातारा - प्रतिनिधी.

         येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये व्यापार जत्रा अर्थात 'ट्रेड फेअर डे' उत्साहात संपन्न झाला. या ट्रेड फेअर डे चे उद् घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  राजेंद्र मोरे यांनी केले. डॉ. मोरे यांनी सर्व स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. तसेच व्यवसायात धाडसाने उतरणे व स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये प्राप्त करण्यासाठी या ट्रेड फेअर डे मधील अनुभव उपयोगी पडतील असा आशावाद व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील कौशल विकास विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भविष्यात स्वतःचा उद्योग - व्यवसाय , स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी  आवश्यक असणारी कौशल्ये देण्याच्या उद्देशाने   'ट्रेड फेअर डे' चे आयोजन करण्यात आले होते.  दुपारी उद् यनराजे भोसले महाराज साहेब यांनी 'ट्रेड फेअर डे' ला भेट देऊन सहभागींचा उत्साह वाढवला.

       या 'ट्रेड फेअर डे' मध्ये विविध खाद्यपदार्थ, थंडगार बर्फाचे गोळे, पॉपकॉर्न, ऊसाचा रस, बाजरीची भाकरी, चटणी , चिकन रस्सा, चिकन प्लेट, पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी, बदामशेफ, फालुदा, मट्ठा , ओली भेळ,  कलिंगड, भजी , थंडगार सरबत , कोल्ड कॉफी,  गुलाबजाम, केक, शीतपेय, गोळ्या , बिस्किटे, मोबाईल एक्सेसिरीज, फनी गेम्स इ.  प्रकारचे ३२ स्टॉल उभारण्यात आले होते. छत्रपती शिवाजी कॉलेज मधील तसेच आसपासच्या शाळा महाविद्यालयातील  विद्यार्थी , पालक व शिक्षकांनी या व्यापार जत्रेस भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये स्टॉलची आकर्षक रचना करण्याची, रुचकर पदार्थ बनवून ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याची व मालाची जाहिरात‌ करण्याची स्पर्धा दिसून आली.  महाविद्यालयातील प्रत्येक विभागाने या 'ट्रेड फेअर डे' मध्ये सहभाग घेतला. परीक्षक म्हणून इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजचे प्राध्यापक प्रवीण जाधव व महिला महाविद्यालय सातारा येथील प्राध्यापक अभिजीत फटे यांनी काम केले. स्टॉलची रचना, गुणवत्ता, नाविन्यता, स्वच्छता, सादरीकरण, ग्राहकांचा प्रतिसाद,  जाहिरात पद्धती ,वेळेचे नियोजन , ताळेबंद ठेवणे इत्यादी कौशल्ये विद्यार्थ्यांनी स्व अनुभवातून आत्मसात केली. 

      या 'ट्रेड फेअर डे' चे समन्वयक म्हणून कौशल्य विकास विभागाचे प्रमुख डॉ. संदीप किर्दत यांनी काम केले. उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रामराजे माने -देशमुख, डॉ. रोशनआरा शेख , प्रा. गणेश पाटील, डॉ. शिवाजीराव पाटील, डॉ. धनाजी मासाळ , डॉ. सविता मेनकुदळे, डॉ. सुभाष वाघमारे,डॉ. कांचन नलवडे, प्रा. विक्रम ननावरे , डॉ. रघुनाथ साळुंखे, डॉ. धनंजय नलवडे,  डॉ. गणेश लोखंडे, डॉ. राज चव्हाण, डॉ. केशव पवार, डॉ.अभिमान निमसे ,डॉ. सुधाकर कोळी , प्रा. राजेंद्र तांबिले व कार्यालयीन प्रमुख तानाजी सपकाळ यांचेसह सर्व विभागप्रमुख व शिक्षक- शिक्षकेतर सेवक वर्गाने ट्रेड फेअर डे यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .