कोडोली हायस्कूल मध्ये उन्हाळी छंद वर्ग शिबिराचे आयोजन.
कोडोली हायस्कूल मध्ये उन्हाळी छंद वर्ग शिबिराचे आयोजन.
कार्वे - प्रतिनिधी.
भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाले मध्ये उन्हाळी छंद वर्गाचे उत्साहात सुरुवात झाली. छंद वर्गाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.यादव पी. पी.यांनी केले. तसेच प्रशिक्षक महेश जगताप सर यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्व: संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाचे धडे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकसह देण्यात आले. यावेळी प्रशालेचे सहशिक्षक मोरे आय. जे. यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम व आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संदे एस. ए. यांनी केले. प्रस्ताविक प्रशालेतील सहशिक्षिका सौ. जाधव व्ही.ए. यांनी केले. तर आभार प्रशालेचे सहशिक्षक श्री. आंबे सर यांनी व्यक्त केले. या शिबीरास प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments
Post a Comment