राजकीय पक्ष व उमेदवार,नेते यांनी व्यसनाविरोधी प्रचार प्रबोधनाची भूमिका घेऊन कृती करण्याची गरज.
राजकीय पक्ष व उमेदवार,नेते यांनी व्यसनाविरोधी प्रचार प्रबोधनाची
भूमिका घेऊन कृती करण्याची गरज.
"दारूबंदी कृती समिती शिराळा तालुका अध्यक्ष पोपट बनसोडे असे आवाहन."
शिराळा - प्रतिनिधी.
महाराष्ट्र मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहे यातूनच ढाबा संस्कृती वाढलेली दिसून येते. यामुळे सामाजिक अवनती होते असं प्रतिपादन दारूबंदी कृती समिती शिराळा तालुका अध्यक्ष मा. पोपट बनसोडे यांनी केलंय.
दारू,मटण, पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराला मत देऊ नका.आमच्या आया बहिणीचे उध्वस्त करणारे संसार व तरुण पिढीला व्यसनाच्या नादी लावणाऱ्या उमेदवाराला आपले मत देऊ नका निवडणुकीच्या काळात जनतेला दारूच्या नशेत ठेवून त्यांच्याकडून मते मिळवली जातात. अनेकांना निवडणूक प्रचार काळात दारूचे व्यसन लागते अशा पदार्थाची निर्मिती व वितरण आणि विक्री यावर सरकारचे नियंत्रण नाही, कायदे ,नियम तोडून दिवसेंदिवस व्यसनाचा विळखा वाढतच आहे. यामुळे आरोग्याचे प्रश्न, शोषण,गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अपघात आणि बेकायदेशीर बाबी व्यसनातून निर्माण होत आहेत. व्यसन हे विवेक विरोधी असून समाजाचे आणि देशाचे स्वास्थ्य बिघडणारे आहे.त्यामुळे व्यसनाविरोधी प्रचार प्रबोधन व राजकीय पक्ष व उमेदवार नेते यांनी भूमिका घेऊन कृती करण्याची गरज आहे. देशात सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेत व्यसन विरोधी भूमिका घेण्याचे आव्हान राजकीय पक्ष व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दारूबंदी कृती समिती शिराळा तालुका अध्यक्ष पोपट बनसोडे असे आवाहन केलंय.

Comments
Post a Comment