Posts

राजकीय वैर संपवून कराडचे बाबा-काका पुन्हा एकत्र.

Image
  राजकीय वैर संपवून कराडचे बाबा-काका पुन्हा एकत्र. कराड, - प्रतिनिधि,   संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वैरत्त्वामुळे गाजलेले कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे दोन्ही नेते तब्बल तीन दशकांनी पुन्हा एकत्र आले आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील यांच्यातील राजकीय वैरत्त्व संपुष्ठात आलं आहे.   काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कराडमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्यात विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील काँग्रेसमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. कराड हा काँग्रेसचा गड मानला जातो. मात्र, एवढी वर्षे या गडाला 2 किल्लेदार होते. ते म्हणजे विलासकाका उंडाळकर आता 82 वर्षांचे आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण 74 वर्षांचे आहे. पृथ्वीराज चव्हाण हे विलासराव पाटील-उंडाळकर यांना उद्देशून म्हणाले की, आपण दोघे आपापसात भांडत राहिलो. त्यामुळे जातीयवादी भाजप पक्षानं फायदा उचलला. आपल्यातल्या मतभेदामुळे काँग्रेस पक्षाचंही मोठं नुकसान झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी कबूल केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह य...

तुळसण रेशनिंग दुकानदार विरोधात कारवाई करण्याचे मागणीचे निवेदन.

Image
  तुळसण रेशनिंग दुकानदार विरोधात कारवाई करण्याचे मागणीचे नागरीकांनी दिले निवेदन.   उंडाळे - प्रदिप पाटील, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या धान्यावर डल्ला मारून  तुळसण ता.कराड येथील स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजारासह जादा भावाने विक्री करत असून, त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तुळसण ग्रामस्थ व शिधापत्रिकाधारकांतून होत आहे. याबाबतचे निवेदन स्थानिक शिधापत्रिकाधारकांनी यांनी कराड येथील तहसीलदारांना दिले आहे.तुळसण ता.कराड येथील रास्त भाव धान्य दुकान चालवण्यात येते. दुकानाचे चालक मनमानी करून शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप करत नाहीत. ग्राहकांची फसवणूक करतात. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य (गहू व तांदूळ) वितरित  करण्याचा दर गहु २रुपये किलो , तांदुळ ३ रुपये किलो याप्रमाणें करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, संबधित रेशनिंग दुकानचालक शासनाने ठरवुन दिलेल्या दरा पेक्षा जास्त दराने विक्री करत असुन मागील दोन महिनापासुन शासनाकडून देण्या...

रेठरे धरण ग्रामपंचायतींच्या सरपंच लतिका पाटील यांना कोरोना योध्दा सन्मान.

Image
  रेठरे धरण ग्रामपंचायतीच्या सरपंच लतीका पाटील यांना कोरोना योद्धा हा सन्मान. कराड - प्रतिनिधि, (सारिका मंडले) रेठरे धरण ता वाळवा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच लतीका पाटील यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे हस्ते सन्मान करण्यात आला या वेळी दादासो पाटील, उमेश बनसोडे पोलीस पाटील ग्रामसेवक गजानन धसके तलाठी दिपाली थोरबोले ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ घेवदे, रविंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, महिला मंच च्या सदस्य ज्योती देसाई हे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मंडले म्हणाल्या महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करणे महिलांनी चूल आणि मूल या गोष्टी बाजूला ठेवून स्वतः बरोबर इतर महिलांचा देखील विकास करावा यासाठी माझे प्रयत्न राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाच मिनिटाचा फटाकेमुक्त दीपावलीसाठी अहवान.

Image
  स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी  फटाकेमुक्त दीपावलीसाठी  प्रबोधनात्मक उपक्रम . उंडाळे, प्रतिनीधी ,                      covid-19 मुळे सध्या शाळा महाविद्यालय बंद आहेत अशा कालावधीत शिक्षण मात्र सुरू आहे. हे औचित्य साधत फटाक्यांमुळे दिपावलीत होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उंडाळे ता.कराड  येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाच मिनिटाचा फटाकेमुक्त दीपावली साजरी करा असा प्रबोधनात्मक व्हिडिओ बनवून विद्यार्थीच्या हाँटसाँपवर  ग्रुप वर देऊन ऑनलाइन व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.                                      सध्या covid-19 मुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत. शिक्षण सुरू आहे सध्या दिपावली हा सण साजरा होत आहे. यासाठी राष...

सहाय्यक अभियंता अजय बोधे यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

Image
  सहाय्यक अभियंता अजय बोधे यांना कोरोना योद्धा हा सन्मान. कराड - प्रतिनिधि,  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ च्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोरोनो योद्धां हा सन्मान देवुन गौरविण्यात आले या मध्ये कराड डिव्हिजन चे सहाय्यक अभियंता अजय बोधे यांना कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले या वेळी गुलाब गांगुर्डे, धीरज साळवे, अनिल ठोंबरे, विजय लोखंडे, अतिश शेवाळे, किशोर सुर्यवंशी, अक्षय जाधव, मिलिंद चव्हाण, रोहित चव्हाण अमोल साळुंखे टेक्निशियन कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते या वेळी सहाय्यक अभियंता बोधे यांनी या डिव्हिजन चा नं नेहमीच अग्रेसर राहीला आहे याचे सर्व श्रेय येथील कर्मचारी यांना केलेल्या मेहनतीने मुळेच शक्य झाले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

ग्रामीण गृहनिर्माण अभियंते वाऱ्यावर .

Image
ग्रामीण गृहनिर्माण अभियंते वाऱ्यावर  . ' मानधनाअभावी होताहेत हाल , सीईओंना निवेदन  ' कराड - प्रतिनिधि, शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी कर्मचार्यांची   निवड केली जाते, यामुळे शासनाचा कारभार सुरळीत चालला जातो.परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाची जबाबदारी शासन पाळत नसल्याचे समोर येत आहे.याची प्रचीती येते  पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांना तब्बल  १४  महीने मानधन न मिळालेची धक्कादायक बाब समोर येत आहे .यामुळे या कंत्राटी कर्मचार् यांची अवस्था हलाखीची बनली आहे.याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घेऊन मानधन देण्याची आवश्यकता आहे .       सातारा जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना राबवली जाते.या योजनेचा लाभ बहुतांश लोकांना मिळाला. ही योजना पूर्णपणे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वर अवलंबून असून  त्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा ग्रामीण  गृहनिर्माण अभियंत्यांचा आहे. या अभियंत्यांना ऑगस्ट २०१९ पासून  आज अखेर मानधन देण्यात आलेले नाही .    अशा परिस्थितीत सुद्धा कंत्राटी तत्त्वावर असणारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता का...

देवाप्पा रामचंद्र शेंडगे यांचे निधन . ' देवऋषी या नावाने परिसरात परिचित होते'.

Image
  देवाप्पा रामचंद्र शेंडगे यांचे वयाच्या १०१ व्या  वर्षी निधन . ' देवऋषी या नावाने परिसरात परिचित होते'. साळशिरंबे - प्रतिनिधी , साळशिरंबे येथील देवाप्पा रामचंद्र शेंडगे यांचे सोमवार  दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. बिरुदेव देवस्थान समिती साळशिरंबे  चे ते विश्वस्त होते .परिसरातील लोक त्यांना देवऋषी या नावाने ओळखत होते त्यांच्या पश्चात  चार मुले, मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.         रक्षा विसर्जन गुरूवारी दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी साळशिरंबे येथे होणार आहे.