ग्रामीण गृहनिर्माण अभियंते वाऱ्यावर .

ग्रामीण गृहनिर्माण अभियंते वाऱ्यावर  .

' मानधनाअभावी होताहेत हाल , सीईओंना निवेदन  '







कराड - प्रतिनिधि,

शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी कर्मचार्यांची   निवड केली जाते, यामुळे शासनाचा कारभार सुरळीत चालला जातो.परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाची जबाबदारी शासन पाळत नसल्याचे समोर येत आहे.याची प्रचीती येते  पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांना तब्बल  १४  महीने मानधन न मिळालेची धक्कादायक बाब समोर येत आहे .यामुळे या कंत्राटी कर्मचार् यांची अवस्था हलाखीची बनली आहे.याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घेऊन मानधन देण्याची आवश्यकता आहे .
      सातारा जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना राबवली जाते.या योजनेचा लाभ बहुतांश लोकांना मिळाला. ही योजना पूर्णपणे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वर अवलंबून असून  त्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा ग्रामीण  गृहनिर्माण अभियंत्यांचा आहे. या अभियंत्यांना ऑगस्ट २०१९ पासून  आज अखेर मानधन देण्यात आलेले नाही .
   अशा परिस्थितीत सुद्धा कंत्राटी तत्त्वावर असणारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता काम करतच आहेत. आज ना उद्या आपल्याला मानधन मिळेल या आशेवर ते काम करत आहेत जरी मानधनाची वाट वर्षभर बघत बसलो तर घराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला  आहे.
      सध्या कोरोना काळात  देखील हे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता लोकांना सेवा देत आहेत. ज्या संस्थेमार्फत या अभियंत्यांची निवड केली जाते त्यांचे बरोबर वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील  इच्छित यश प्राप्त झालेली नाही.सदर संस्थेचा करार संपलेला असून.  नवीन संस्थेला नेमणूक देण्यात आलेली आहे पण हे कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अजूनही वाऱ्यावरच आहेत . जिल्ह्याला निधी आलेला असूनदेखील मानधन देण्यास टाळाटाळ होत आहे .याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवेदन दिले आहे .
 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .