शिष्यवृत्ती परीक्षेत वैष्णवी आबासो पाटील हिचे यश. तालुक्यात गुणवत्ता यादीत पंधरावा क्रमांक पटकावला.

शिष्यवृत्ती परीक्षेत वैष्णवी आबासो पाटील हिचे यश.

"तालुक्यात गुणवत्ता यादीत पंधरावा क्रमांक पटकावला. "

 उंडाळे - प्रतिनिधि,                         
शिष्यवृत्ती परीक्षेत येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी आबासो पाटील हिने तालुक्यात गुणवत्ता यादीत पंधरावा क्रमांक पटकावला. तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिला विभाग प्रमुख आर. बी. पाटील,जगन्नाथ माळी, शंकर आंबवडे,आर. जी. सुतार, विरभद्र खुरपे, व्ही. के भोसले, व्ही. एस. कुंभार, एस. व्ही. पाटील, राजेंद्र गोरे, धनंजय पवार. यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थिनीचा संस्थेचे संचालक अँड आनंदराव पाटील, प्राचार्य बी.पी मिरजकर हौसाई कन्या शाळेचे मुख्याध्यापक बी. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.               फोटो ओळी.. वैष्णवी पाटील हिचा सत्कार करताना अँड आनंदराव पाटील, प्राचार्य बी.पी मिरजकर, मुख्याध्यापक बी आर पाटील, आर. बी. पाटील, रामचंद्र पाटील, जगन्नाथ माळी.  सौ. वनिता कुंभार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .