स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात "डोळ्यांची निगा व दक्षता" या विषया वर ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्यान संपन्न .
स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात "डोळ्यांची निगा व दक्षता" या विषया वर ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्यान संपन्न .
'नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल फासे यांनी केल मार्गदर्शन.'
उंडाळे - प्रतिनिधि,
दृष्टी चांगली राहिली पाहिजे यासाठी बालवयापासूनच डोळ्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कराडचे नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल फासे यांनी केले. येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये *डोळ्यांची निगा व दक्षता* या विषया वर ऑनलाईन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी. पी. मिरजकर, जगन्नाथ माळी, शंकर आंबवडे, गणेश शेवाळे यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री फासे म्हणाले, सध्या लाँकडाऊनचा कालावधी आहे. शाळा सुरू झाले आहेत नववी ते बारावी हे वर्ग सुरू झाले आहेत. पाचवी ते आठवी या वर्गांना ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वापर जास्त होत आहे .त्यामुळे विद्यार्थी एकटक त्या मोबाईलकडे पाहत आहेत, पापण्याची उघडझाप न झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून पाणी येणे वगैरे पद्धतीचे विकार होऊ शकतात. यासाठी या मोबाईल कडे जास्त वेळ न पाहता वारंवार आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करणे आवश्यक आहे.त्याबरोबर क्षितिजाकडे पाहावे त्यामुळे पाणी येणे हे थांबून जाईल. त्याबरोबरच विद्यार्थी गेम खेळताना एकटक पाहतात. त्यामुळे ही डोळ्याचे विकार होतात.
यासाठी गाजर, मूळा, पालेभाज्या आहारामध्ये ठेवल्या तर डोळ्याची आरोग्य चांगले राहते.पालकांनी आपल्या पाल्याची वयाच्या चवथ्या वर्षी डोळे तपासणी करून शाळेमध्ये घालावे . वेळोवेळी डोळ्याची काळजी घ्यावी.
याबरोबरच विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येत असताना मास्कचा वापर आवश्यक करणे गरजेचे आहे त्याबरोबरच सोशल डिस्टंसिंग याची गरज आहे.अशा पध्दतीने आपण आपले आचरण ठेवले तर आपण कोरोनाला हरवू शकू.या साठी विद्यार्थ्यांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनीटायझर या त्रिसूत्रीचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी रवींद्र खांदारे म्हणाले, जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय प्रतिवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. या वर्षी लाँकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेक उपक्रम विद्यालयाने राबवले व त्यांनी राज्यापर्यंत पोहोचवले.त्यामुळे अनेक विद्यालयाना प्रेरणा मिळाली. सध्या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून डोळ्याची निगा कशी राखावी यासाठी विद्यालयाने आयोजित केलेले मार्गदर्शन वर्ग हा अतिशय स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले केले.
विस्तार अधिकारी शबनम मुजावर, केंद्रप्रमुख सदाशिव आमणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य बी. पी. मिरजकर यांनी प्रास्ताविक केले. एस. व्ही. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सौ. वनिता कुंभार यांनी आभार मानले.

Comments
Post a Comment