श्री. विकास हणमंतराव शेवाळे यांची भाजपा कराड दक्षिण मंडल व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड .

 

श्री. विकास हणमंतराव शेवाळे यांची भाजपा कराड दक्षिण मंडल व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड .



कराड -प्रतिनिधी,

   कराड दक्षिण भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षपदी मलकापुर शास्त्रीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते श्री.विकास हणमंतराव शेवाळे यांची निवड करण्यात आली. य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डाॅ.सुरेश भोसले यांच्या हस्ते निवडीचे पञ त्यांना देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंञी आमदार चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ.अतुलबाबा भोसले,जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तालुकाध्यक्ष पै.धनंजय पाटील, कृष्णेचे  व्हा.चेअरमन जगदीशदादा जगताप,संचालक धोंडीराम जाधव,दयानंद पाटील, नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, यांची यावेळी उपस्थिती होती.शेवाळे यांनी  मलकापुर नगरपरिषद निवडणूकीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमीका निभावलेले होती,

 यावेळी त्यांनी व्यापारी वर्गाचा अडचणी सोडवू तसेच पक्ष बळकटी साठी तत्पर राहून, येणारा काळात पक्षाला अधिक मजबूत करणेची ग्वाही दिली,

 निवडीबध्दल  त्यांचे नगरसेवक अजित थोरात,विक्रम रैनाक मा.उपसरपंच मलकापूर सुहास कदम,राजू मुल्ला,आण्णासो काशीद तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .