हौसाई कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीनी दिली मास्कची अनोखी भेट.

 हौसाई कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीनी दिली मास्कची अनोखी भेट.

"  कु. रिंकू प्रजापत , उषा प्रजापत, पूजा प्रजापत या माजी विद्यार्थ्यांनी २०० मास्क विद्यार्थ्यांसाठी दिले ."


कराड - प्रतिनिधि,

मलकापूर ता. कराड येथील हौसाई कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीनी स्वतः मास्क शिवून  विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 200 मास्कची  अनोखी भेट दिली. विद्यार्थिनीच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी मलकापुर ता. कराड येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या हौसाई कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी कु. रिंकू प्रजापत , उषा प्रजापत, पूजा प्रजापत या माजी विद्यार्थ्यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या आपल्या पूर्वीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सुमारे दोनशे मास्क स्वतः तयार केले. आणि शासनाच्या  निर्णयानुसार शाळा सुरू होणाऱ्या पहिल्या दिवशी हे मास्क शाळेकडे सुपुर्त केले. 

विशेष म्हणजे या विद्यार्थिनी शाळेत पूर्वी शिकत असताना शिक्षक असणारे बी. आर. पाटील नुकतेच विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आहेत या पार्श्वभूमीवर या विद्यार्थिनींनी जणू आपल्या शिक्षकांना मास्क रुपी गुरुदक्षिणा दिली आहे. आपण शाळेतून शिकून गेलो तरी ज्या शाळेने शिक्षकांनी आपणास घडवले त्यांच्याप्रती आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेने आम्ही छोटीशी भेट दिल्याचे या विद्यार्थिनींनी यावेळी सांगितले. या माजी विद्यार्थिनीच्या  आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे विद्यार्थी-शिक्षक यामधून कौतुक होत आहे. या मास्क वितरण प्रसंगी  मुख्याध्यापक बी. आर. पाटील, कल्याण कुलकर्णी, सौ. जयश्री पाटील सौ. रुपाली माळी, ऋषीकेश पोटे, श्रीमती रूपाली महाडीक. आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.                                               



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .