कोडोली येथील जि.प .प्राथ. शाळेचा शिष्यवृत्ती चा निकाल ७३.०७ टक्के.

 कोडोली येथील जि.प .प्राथ. शाळेचा शिष्यवृत्ती चा निकाल ७३.०७  टक्के.



कार्वे - प्रतिनिधि,

                     महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या उच्च पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेत आय. एस. ओ. मानांकन प्राप्त जि. प. प्राथमिक शाळा कोडोली ता.कराड येथील कु.आदेश तातोबा जाधव या विद्यार्थ्याने 288 पैकी 230 गुण संपादन केल्याने शिष्यवृत्ती पात्र ठरला आहे. तसेच 200 पैकी अधिक गुण मिळालेल्या मध्ये श्रेयस गुरव 210 गुण, आदिती पाटील 206 गुण, श्रावणी जगताप 204 गुण, राज जगताप 202 गुण, तनुजा मोरे 200 गुण इत्यादी आहेत. तसेच अक्षदा माने,अक्षरा घाडगे,आरती जगताप, जान्हवी तांबेवाघ, कार्तिक शिंदे, पूजा जगताप, समृद्धी लोकरे, सानवी जगताप, संग्राम कोळी, शिवराज रायते, श्रीकांत मदने, शुभांगी मोरे, वरदराज जगताप इत्यादी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.विनायक निकम श्री. महेशकुमार बोंगाळे  श्री. विजय पाटील सौ. छाया कुंभार सौ. स्वाती गायकवाड सौ. जयश्री सावंत श्रीम. संगीता माने शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, सरपंच ,उपसरपंच, ग्रामस्थ, पालक यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .