आरळा येथे विजेच्या तारेचा शॉक लागुन गवंडी कामगाराचा मृत्यु.

 आरळा येथे विजेच्या तारेचा शॉक लागुन गवंडी कामगाराचा मृत्यु.


शिराळा -  प्रतिनिधी   (आनंदा सुतार )

आरळा ता. शिराळा येथे आर सी सी इमारतीचे बांधकाम करत असताना अकरा हजार के व्ही च्या विजेच्या तारेचा शॉक लागुन गवंडी काम करणाऱ्या अनिल परशराम पाटील वय २४ सध्या रा. आरळा मुळ गांव मेरडा ता. खानापूर जिल्हा बेळगांव  याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडलीअसुन याची फिर्याद अनिल यांचा भाऊ सुनिल परशराम पाटील वय ३२ यांनी कोकरुड पोलिसात दिली आहे.

     याबाबत कोकरुड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरळा येथे विठ्ठल आनंदराव पाटील मुळ गांव उदागिरी ता. शाहूवाडी  यांच्या आर सी सी इमारतीच्या दुसऱ्या माजल्याचे बांधकाम आरळा येथे सुरू असताना मयत अनिल हा मोबाईल वरआलेल्या फोनवर बोलत असताना इमारतीच्या बाजूने गेलेल्या ११ हजार के. व्ही. उच्च दाबाच्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन अनिल परशराम पाटील वय २४  हा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकला गेला. स्थानिक नागरीकांनी त्याला तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

     या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हावलदार कुंभार करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .