रमाई आवास घरकुल योजनेचा निधी त्वरित दयावा :रवी कांबळे.
रमाई आवास घरकुल योजनेचा निधी त्वरित दयावा :रवी कांबळे.
कराड - प्रतिनिधि,
कोरणासारख्या महामारी रोगामुळे, गेल्या काही महिन्यापासून लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे.या बेरोजगारीमुळे राज्यातील दुष्काळी असलेल्या सर्वसामान्य लोकांवर,गेले काही दिवसांपासून आर्थिक संकट उभे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने रमाई आवास योजनेचा थकीत निधी लाभार्थी लोकांना त्वरित द्यावा, अशी मागणी,मं.कोळे गावचे, राष्ट्रीय सर्व श्रमिक युनियन (प. महाराष्ट्र )सरचिटणीस रवी कांबळे यांनी, नामदार हसनजी मुश्रीफ (ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांना निवेदनाद्वारे केली आहे.अशातच रमाई आवास योजनांचे सन, 2018, -2019, -2020 मधील मंजूर लाभार्थी पैकी, काही घरकुल कामे चालू मध्ये बंद पडली आहेत, काही उसनवारी करून पूर्णत्वास नेहली आहेत. परंतु गेले अनेक दिवस शासन दरबारी घरकुलांचे अनुदान न मिळाल्यामुळे सर्व सामान्य घरकुल लाभार्थी यांचे संपूर्ण आर्थिक गणित ढासळले असून लाभार्थी चिंतेत पडला आहे.घरापासून लाभार्थी वंचित राहिला आहे. यावेळी निवेदन करताना, रवी कांबळे सरचिटणीस (राष्ट्रीय श्रमिक युनियन ) व, सागर पाटिल माहितीअधिकार(R.T. I.) महाराष्ट्र राज्य, सचिव निवेदन केले.

Comments
Post a Comment