फुटपाथ नक्की कोणासाठी ? सार्वजनिक बांधकाम विभागाला पादचाऱ्यांचा प्रश्न.

 फुटपाथ नक्की कोणासाठी  ?  सार्वजनिक बांधकाम विभागाला पादचाऱ्यांचा प्रश्न.

पादचाऱ्यांच्या हक्काची जागा व्यावसायिक कारणांसाठी वापरणारा यांच्यावर कोण वचक बसवणार  ?


  
उंडाळे -  ( प्रतिनिधि) प्रदिप पाटील, 

रस्त्यावर पहिला हक्क आहे पादचाऱ्यांचा असे नेहमीच सांगितले जाते; मात्र नव्याने होऊ घातलेल्या पाचवड फाटा-येणपे मुख्य मार्गाच्या  रस्त्यांच्या दोन्ही बाजुस असण्या-या फुटपाथचे चित्र पाहता, पादचाऱ्यांनी चालायचे कुठून? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना  पडला आहे.यामुळे पादचारी हा पादचारी मार्ग वापरू शकत नाही यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.  

पाचवड फाटा, ओंड,  उंडाळे गावा अंतर्गत बांधण्यात येणा-या गटारी वजा फुटपाथ हा नेमका कुणासाठी ? 

   वडापाव गाड्या, टपऱ्या, भाजीपाला, फळे  विक्रेत्यांनी फुटपाथ आमच्या हक्काचे अशा  भूमिकेने सर्वच ठिकाणी ताबा घेतला असून, या अतिक्रमणांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असुन याकडे स्थानिक पोलिस, प्रशासनासह संबंधित गावच्या ग्रामपंचायती अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे. 

ठराविक गावच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये 

फुटपाथवरील अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढ होत असुनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्यांच्या भुमिकेत दिसुन येतो तर स्थानिक ग्रामपंचायती मार्फत ह्या अतिक्रमणास आश्रय देण्याबरोबर संबंधित गाडे व्यवसायिक, भाजीपाला व्यवसायिकाकडुन पावत्या घेण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत असुन  अतिक्रमण "जैसे थे' होत आहे. 

तर काही ठिकाणच्या गावामध्ये या अतिक्रमणानासाठी "राजकीय" पाठिंबा मिळत असल्याने संबंधित गाडया भोवती पक्के बांधकाम ही पहावयास मिळाल्यास आश्चर्य असे काहीचं नसल्याची चर्चा मात्र पादचाऱ्यांतुन व्यक्त होत आहे.

  सध्या या मार्गाचे काम चालु असल्याने वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नाले वजा फुटपाथ वरुन चालणे कठिण होत असल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी  फुटपाथऐवजी रस्त्यावरून वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागत असुन यामध्ये कित्येक अपघात झाले आहेत. आणि होत आहेत तरीही प्रशासन व स्थानिक ग्रामपंचातीस त्याचे काहीही गांभीर्य दिसुन येय नाही. काही ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे ऐकेरी वाहतूक असल्याने पादचारी रस्त्यावर , वाहने रस्त्यावर तर वाहतुक ठप्प असे चित्र पहावयास मिळत आहे.

  दिवसेंदिवस वाढण्या-या फुटपाथ वरील अतिक्रमणावर वेळीच उपाय योजना करुन निदान पादचाऱ्यांना चालण्यासाठी तरी फुटपाथ मोकळा करावा, व संभाव्य अपघातांना आळा घालावा.  अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सर्वसामान्यांना मधुन होत आहे.


हक्काची जागा तरीही फुटपाथवर अतिक्रमण..

या मार्गावरील रस्त्यालगत असणारे बहुतांश वडापाव, हाँटेल, फळे, भाजीपाला व्यवसायिकांचे पक्के गाळे भाडे तत्वावर असुनही , मात्र फुटपाथवर अतिक्रमण करत व्यवसाय करताना दिसुन येत आहेत.


रस्त्याकडेला घाणीचे साम्राज्य..

खराब झालेला भाजी पाला, फळे, तसेच वडापाव व्यवसायिकाच्या आसपास असणाऱ्या घाणीतच संबंधित व्यापारी व्यवसाय करताना दिसुन येत आहेत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .