कोरोनान सारा देश थांबवलाय, उंडाळे , ओंड परीसर अवैध दारू विक्रीन झिंगवलाय.
कोरोनान सारा देश थांबवलाय, उंडाळे , ओंड परीसर अवैध दारू विक्रीन झिंगवलाय.
उंडाळे -प्रतिनिधी ( प्रदीप पाटील)
ओंड व उंडाळे परिसरातील ग्रामीण भागात लॉकडाऊननंतर काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या गोरखधंद्याकडे प्रशासनाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करतात असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते की लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊन मध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना अटी व शर्तीच्या अधीन राहून दारूविक्रीला रीतसर परवानगी दिली. सध्या सरकार मान्य देशी दारू दुकानांतून पार्सलच्या रूपात दारू विक्री सुरू असून ही विक्री सुरू असल्याचे दिसते.
तसेच ओंड व उंडाळे परिसरात येणाऱ्या ढाब्यावर व ओंड बसस्थानक परिसरात राजरोजपणे अवैध दारु विक्री होत असून देशी दारू पासून तर विदेशी दारू पर्यंत सर्वच प्रकारची दारू सर्रास मिळायला लागली असून या देशी व विदेशी दारू मध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलल्या जात आहे.
हा प्रकार ओंड व उंडाळे परिसरामध्ये सर्रास सुरू असून संबंधितांनी वेळोवेळी या गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या तरी त्याला कोणत्याही प्रकारे आळा घातला जात नसल्याने यास वरदहस्त कुणाचा? असा सवाल ग्रामस्थामधुन विचारला जात आहे.
ओंड बसस्थानक परिसररात रस्त्यांवर लगत सरकारमान्य देशी दारूचे परवाना धारक व बियर बार दुकाने दिसून येतात. मात्र याच परिसरात इतर ही अवैध व्यवसायिक दारु धंदे बिनबोभाटपणे चालु असुन त्याच परिसरातील ढाब्यावर भागात अवैध दारू विक्रेत्यांना एका मर्जीतल्या व्यक्तीकडून दुचाकीद्वारे उंडाळे परिसरातील वाडी वस्त्यावर वेगवेगळ्या ब्रान्डची दारूचा पुरवठा केला जातो.या दारु पोहोचविणाऱ्या तस्करांचे ही प्रशासनाबरोबर मैत्रिपूर्ण संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भर मार्गावरुन त्यांची वाहने कधीच अडविली जात नाहीत.
लोकसेवक वेळोवेळी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल जप्त करतात परंतु जप्त केलेला विविध प्रकारचा विशिष्ट बॅच नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकानातून पुरवठा केला गेला? याची साधी चौकशीही केली जात नाही. त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशा अविर्भावात ते वागताना दिसतात व पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू करतात. ह्यासाठी जप्त केलेल्या मालाची सूक्ष्म व सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याचे समजते.
वरिष्ठ पातळीवरुन कारवाईची मागणी
राजरोसपणे होणाऱ्या अवैध दारु विक्री व वाहतुकीच्या विरोधात तालुका स्थरावरुन कोणतेही कडक कारवाई पावले असमर्थ असल्याचे दिसुन येत असून ओंड , उंडाळे परिसरात होणाऱ्या अवैध दारुविक्री व दारु वाहतुकीच्या विरोधात आता जिल्हा पातळीवरुन योग्य ती कारवाई करुन ह्या दारु व्यवसायिक आणि वाहतुक करणाऱ्या ची पाळेमुळं कोठुन व कुणाच्या आशिर्वादाने चालु असुन संबंधित अवैध व्यवसायावर लगाम घालण्याची मागणी परिसरातुन जोर धरु लागली आहे.

Comments
Post a Comment