राजकीय वैर संपवून कराडचे बाबा-काका पुन्हा एकत्र.

 राजकीय वैर संपवून कराडचे बाबा-काका पुन्हा एकत्र.


कराड, - प्रतिनिधि,

  संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वैरत्त्वामुळे गाजलेले कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे दोन्ही नेते तब्बल तीन दशकांनी पुन्हा एकत्र आले आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील यांच्यातील राजकीय वैरत्त्व संपुष्ठात आलं आहे.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कराडमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्यात विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील काँग्रेसमध्ये जोरदार प्रवेश केला आहे.कराड हा काँग्रेसचा गड मानला जातो. मात्र, एवढी वर्षे या गडाला 2 किल्लेदार होते. ते म्हणजे विलासकाका उंडाळकर आता 82 वर्षांचे आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण 74 वर्षांचे आहे.पृथ्वीराज चव्हाण हे विलासराव पाटील-उंडाळकर यांना उद्देशून म्हणाले की, आपण दोघे आपापसात भांडत राहिलो. त्यामुळे जातीयवादी भाजप पक्षानं फायदा उचलला. आपल्यातल्या मतभेदामुळे काँग्रेस पक्षाचंही मोठं नुकसान झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी कबूल केलं.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साम दाम दंड भेद वापरून काँग्रेसला संपवायचा निर्णय घेतला आहे. भारतात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. जातीयवादी पक्षाच्या आसऱ्याला जाणार नाही. यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो असल्याची ग्वाही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .