स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे शिक्षक जगन्नाथ माळी यांच्या कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी.
स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे शिक्षक जगन्नाथ माळी यांच्या
कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी.
उंडाळे - प्रतिनिधी ,
स्वतःचे दुःख बाजूला ठेवून कष्टकऱ्यांना दिवाळीचे फराळाचे वाटप करून येथील शिक्षक जगन्नाथ माळी कुटुंबीयांनी गोरगरीब कष्टकऱ्यांचे दिवाळी गोड केली आणि माळी कुटुंबाच्या अनोख्या दिवाळी भेटीचे परिसरात कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी या वर्षी दिवाळी सणावर कोरोना चे संकट होते. त्यामुळे कामधंदा, रोजगार नसल्याने गरीब कष्टकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे. अशातच दिवाळी सण आल्याने आणि अनेक कुटुंबाची दैना उडाली. पर जिल्ह्य़ातील कारखान्याचे ऊसतोडणी कामगार अशा परिस्थितीत समाजकार्यात नेहमी पुढे असणाऱ्या जगन्नाथ माळी यांना अशा कुटुंबांना फराळाचे पदार्थ भेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे श्री माळी यांचे वडिलांचे सात महिन्यापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळी साजरी करणार नव्हते मात्र त्यांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून गोरगरीब कष्टकरी कुटुंबांना करंजी, लाडू, चिवडा, चकली, आदी पदार्थाचे किट करून त्यांनी या कुटुंबांना वाटप केले. श्री. माळी हे येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आदर्श शिक्षक अनेक पुरस्कार मिळालेल्या अनेक सामाजिक उपक्रमात ते सहभागी असतात. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

very Good work
ReplyDelete