येवती व परिसरात "रेंज"गायब. 'अहर्निश ,सेवामहे' हे ब्रिद वाक्य ..फक्त नावालाच.
येवती व परिसरात "रेंज"गायब.
'अहर्निश ,सेवामहे' हे ब्रिद वाक्य ..फक्त नावालाच.
उंडाळे :- प्रतिनिधि, (प्रदिप पाटील )
कराड दक्षिण तालुक्यातील येवती, शेवाळवाडी, घराळवाडी ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवरील मोबाईल ग्राहकांना भारतीय दूरसंचार निगम अर्थात "बीएसएनएल'च्या नियोजनशून्य कारभाराचा फटका हजारो ग्राहकांना बसत असून, दिवसेंदिवस सेवेत सुधारणा करण्याऐवजी ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यास अपयशी ठरू लागल्याने वैतागलेले ग्राहक आता ग्राहक खासगी कंपन्यांकडे आकर्षित होऊ लागले आहेत.
दूरसंचार विभागाचे खरे तर "अहर्निश सेवामहे' हे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ ग्राहकांना नेहमी सर्वोत्तम सेवा देणे असा होतो. मात्र, सध्याच्या घडीला दूरसंचार विभाग सर्वोत्तम सोडा पण ग्राहकांना खासगी कंपन्यांकडे वळायला जाणीवपूर्वक भाग पाडत तर नाही ना, असा सवालही ग्राहक उपस्थित करत आहेत. दूरसंचार विभागाचे कराड या तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज कार्यालय आहे. मात्र, बऱ्याच वेळा या कार्यालयालास येवती व परिसरातील ग्राहकानी वेळोवळी तक्रार करुन ही त्यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या सेवेत काम चुकारपणाचा कळस अनुभवल्याने ग्राहक वर्ग वैतागून गेल्याचे दिसुन येत आहे. कराड तालुकातील येवती,शेवाळवाडी, घराळवाडी परिसर हा दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळखला जातो. या परिसरातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईला आहेत. त्यांचे संपर्काचे एकमेव साधन म्हणजे मोबाईल आहे. मात्र, मोबाईलची वारंवार "रेंज' गायब होणे, इंटरनेट कनेक्शन चालू नसणे या कारणांमुळे चाकरमान्यांना आपल्या नातेवाईकांशी संवाद साधणे दुरापास्त होत आहे.
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र असुनही या परिसरातील बहुतांश युवापिढी "वर्क फ्रॉम होम' करत आहेत. मात्र, दूरसंचारची सेवा समाधानकारक मिळत नसल्यामुळे त्यांच्या कामालाही "ब्रेक' मिळतो आहे. आठवड्यातून चार-चार दिवस "रेंज' येत नसल्याने बॅंकांची कामे ठप्प होत आहेत. विशेषतः येवती परिसरातील दूरसंचारची रेंज गायब होणे आता नित्याचे झाले आहे. "रेंज' नसल्यामुळे बॅंक, पतसंस्थांचे आर्थिक व्यवहार थांबत असल्याने याचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य ग्राहक, बसतो आहे.सेवेच्या तक्रारीसाठी दूरसंचार विभागाच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतात, मात्र त्यांच्या मार्फत तातपुरत्या स्वरुपाची मलमपट्टी करण्यावैत्यरिक्त कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसुन येत नाहीत. तसेच सदरिल दुरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास हे अधिकारी फोन उचलत नाहीत. तर त्रस्त ग्राहकांनी नेमकी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न दूरसंचारच्या ग्राहकांना पडत आहे.
"बीएसएनएल'च्या या सुस्त सेवेमुळे ग्राहक नाईलाजाने खासगी कंपन्यांकडे वळू लागलेले प्रयतनात दिसुन येत असताना ही मात्र, याचे कसलेही सोयरसुतक या अधिकाऱ्यांना नाही. कराड दक्षिणच्या इतर विभागात अगदी छोट्या खेड्यातही खासगी मोबाईल कंपन्यांचे टॉवर आहेत. या खासगी कंपन्या ग्राहकांना "बीएसएनएल'च्या तुलनेने चांगली सेवा देत आहेत. कराड तालुक्यात "बीएसएनएल'ची सेवा असमाधानकारक असून, ग्राहकांनी मागणी करूनही लॅंडलाइन, इंटरनेट कनेक्शनबाबत योग्य ती सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे या कारभारात सुधारणा व्हावी यासाठी येवती परिसरातील जागृत ग्राहकांच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही लेखी निवेदन देवुन संबधित कारभारात योग्य त्या सुधारण्या करण्यासाठी मागणी येवती व परिसरातील नागरिक करणारच्या पवित्रात दिसुन येत आहेत.

Comments
Post a Comment