तुळसण रेशनिंग दुकानदार विरोधात कारवाई करण्याचे मागणीचे निवेदन.

 तुळसण रेशनिंग दुकानदार विरोधात कारवाई करण्याचे मागणीचे नागरीकांनी दिले निवेदन.




  उंडाळे - प्रदिप पाटील,

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या धान्यावर डल्ला मारून  तुळसण ता.कराड येथील स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजारासह जादा भावाने विक्री करत असून, त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तुळसण ग्रामस्थ व शिधापत्रिकाधारकांतून होत आहे. याबाबतचे निवेदन स्थानिक शिधापत्रिकाधारकांनी यांनी कराड येथील तहसीलदारांना दिले आहे.तुळसण ता.कराड येथील रास्त भाव धान्य दुकान चालवण्यात येते. दुकानाचे चालक मनमानी करून शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप करत नाहीत. ग्राहकांची फसवणूक करतात. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य (गहू व तांदूळ) वितरित  करण्याचा दर गहु २रुपये किलो , तांदुळ ३ रुपये किलो याप्रमाणें करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, संबधित रेशनिंग दुकानचालक शासनाने ठरवुन दिलेल्या दरा पेक्षा जास्त दराने विक्री करत असुन मागील दोन महिनापासुन शासनाकडून देण्यात येण्या-या मोफत रेशनिंगचे वाटपही करण्यास नकार देत आहे. सदरील रेशनिंग व्यवसायिकावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावी.असे निवेदन तुळसण येथील शिधापत्रिकाधारकातुन करण्यात आले आहे.



हप्ते द्यावे लागतात !!!!


संबंधित रेशनिंग दुकानदार घेत असणाऱ्या जादा दराचे कारण विचारल्यास "आम्ही हप्ते देतो", तुम्हाला काही करायचे ते करा,  असे उत्तर मिळते, हा दुकानदार रेशनिंग धारकांकडुन घेतलेल्या जादा पैशाचे "हप्ते " का? आणि कशासाठी व कुणाला, देतो यांची  प्रशासनाकडुन चौकशी कराण्याची मागणी रेशनिंग धारकामधुन होत आहे.










Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .