येवती येथील भैरवनाथ यात्रा रद्द.

 येवती येथील भैरवनाथ यात्रा रद्द.



येवती - प्रतिनिधि, (ज्ञानेश्वर शेवाळे )

 येवती ता कराड येथील श्री भैरवनाथ देवाची सालाबादाप्रमाणे यंदा १ डिसेंबर मंगळवारी व २ डिसेंबर बुधवारी भरणारी यात्रा कोरोनो च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती येवती ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली. येवती चे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा यंदा दि १ व २ डिसेंबर रोजी आहे मात्र कोरोनो चा वाढता प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे त्यामुळे ही यात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय पोलिसांनी व ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बैठकीत घेण्यात आला त्यामुळे यंदा यात्रेच्या दिवशी कुस्त्या तसेच मनोरंजनाचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत कोणीही मंदिराच्या परिसरात गर्दी करू नये कोरोनो चा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामस्थांनी सर्व खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक दिप ज्योती पाटील यांनी येवती येथील  १ व २ डिसेंबर रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती दिली. त्यामुळे यात्रे साठी कोणीही गर्दी करताना दिसल्यास कायदेशीर कारवाई ला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.

 _______पोलीस उपनिरीक्षक दिप ज्योती पाटील.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .