नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प - हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य व मशागतीसाठी अनुदान.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प.
प्रतिनिधि - प्रदीप पाटील.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प - हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य व मशागतीसाठी अनुदान-
अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -
(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे. (2) २ ते ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.
ब ) आवश्यक कागदपत्रे - 7/12 व 8 अ.
क ) क्षेत्र मर्यादा - एका लाभार्थ्यास हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य व मशागतीसाठी अनुदान कमीत कमी ५०० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत लाभ घेता येईल. यापूर्वी कोणताही शासकीय योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंतच लाभ अनुज्ञेय राहील.
ड ) अर्ज कुठे करावा - इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
ई ) खर्चाचे मापदंड- हरितगृह/शेडनेटगृहातील भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी रु. १४० प्रति चौ मीटर याप्रमाणे खर्चाचा मापदंड आहे. तसेच हरितगृह/शेडनेटगृहातील फुल पिकाच्या कार्नेशन व जरबेरा लागवडीसाठी रु. ६१० प्रति चौ मीटर, अँथुरिअम व ऑर्चिड फुल पिकाच्या लागवडीसाठी रु. ७०० प्रति चौ मीटर तसेच गुलाब व लिलियम फुल पिकाच्या लागवडीसाठी रु. ४२६ प्रति चौ मीटर याप्रमाणे खर्चाचा मापदंड आहे .
अधिक माहिती करिता- मार्गदर्शक सूचना https://drive.google.com/file/d/1UxAh9BH6FbEJWrz-8xEf7twvZFDafIrO/view?usp=drivesdk
source- https//dbt.mahapocra.gov.in

Comments
Post a Comment