तानाजी देशमुख यांची भाजपा कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड.
तानाजी देशमुख यांची भाजपा कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड.
कराड - प्रतिनिधी,
कराड दक्षिण भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी मलकापुर येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांची निवड करण्यात आली.
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डाॅ.सुरेश भोसले यांच्या हस्ते निवडीचे पञ त्यांना देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंञी आमदार चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ.अतुलबाबा भोसले,जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तालुकाध्यक्ष पै.धनंजय पाटील, कृष्णेचे व्हा.चेअरमन जगदीशदादा जगताप,संचालक धोंडीराम जाधव,दयानंद पाटील,पै आनंदराव मोहिते, नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, यांची यावेळी उपस्थिती होती.
देशमुख यांनी यापुर्वी मलकापुर शहर अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय असे कार्य केले असुन. मलकापुर नगरपरिषद निवडणूक विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमीका निभावलेले होती.पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते अग्रभागी राहिलेले आहेत. त्यांच्या निवडीने संघटनेमध्ये नवचैतन्य आले असुन आगामी काळामध्ये पक्षाला यश मिळवून देण्यामध्ये ते महत्वपूर्ण भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त होत आहे. या निवडीबध्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Comments
Post a Comment