Posts

लोकहीतदक्ष राजा छत्रपती शाहू महाराज.

Image
  लोकहीतदक्ष राजा छत्रपती शाहू     महाराज. _________डॉ .बबन घोलप शिराळा - प्रतिनिधि, चिंचोली ता- शिराळा येथे   छत्रपती  शाहू महाराज जयंती साजरी झाली. यावेळी  जेष्ठ समाजसेवक फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी बौद्ध धम्म अभ्यासक डॉ .बबन घोलप दादा हे शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त ऑनलाईन बोलत होते . राजेशाहीत उपेक्षित वंचित बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले असा राजा होणे नाही डॉ . घोलप पुढे म्हणाले शाहू महाराजांच्या जयंती निमित्त  वनमोहत्सवाची सुरुवात केली आहे त्याचे संगोपन करू व त्या झाडांच्या मुळे स्वच्छ व चांगल्या पद्धतीने ऑक्सिजन व फळे मिळतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित लोंढे सर म्हणाले राधानगरी धरण बांधून  शाहू महाराजांनी हरीत क्रांती केली कला क्रीडा शिक्षण यासाठी विशेष भर दिला त्यांचे विचार प्रेरणादायी आहे. याबरोबरच सिध्दार्थ घोलप, मुलाणी सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सरपंच फत्तेसिंग जाधव,  उपसरपंच सुरेश जाधव ,शिवाजी जाधव ,ग्रामपंचायत  सदस्य पै राहुल ...

जनता क्रांती दल संघटनेचा वर्धापनदिन संपन्न .

Image
  जनता क्रांती दल संघटनेचा  वर्धापनदिन संपन्न . जिजाई आश्रम शाळेत साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.  कराड - प्रतिनिधि, राजश्री शाहू महाराज जयंती व जनता क्रांती दल संघटनेच्या 9 व्या  वर्धापनदिनानिमित्त  कोळे  तालुका कराड जिल्हा सातारा येथे मा.श्री अनिल लोंढे जिल्हाध्यक्ष जनता क्रांती दल  यांच्या हस्ते जिजाई आश्रम शाळेत साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.   यावेळी जनता क्रांती दल संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पूजा निलेश भातकर  यांची उपस्थितीती होती.  त्याचबरोबर सौ .प्रिया आलेकर हयुमन राईट्स पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ,सौ .सुनीता भोसले ह्यूमन राईट्स तालुकाध्यक्ष,सौ. सुनीता मोरे संस्थापिका अध्यक्ष दुर्वा महीला उद्योग समुह,श्रीमती काशीबाई साठे महिला कराड तालुकाध्यक्ष जनता क्रांती दल,मा. श्री. मनोज बडेकर कराड तालुका अध्यक्ष जनता क्रांती दल ,मा.श्री .विक्रम साठे कराड तालुका युवक अध्यक्ष जनता क्रांती दल  मा.श्री. योगेश दुपटे पाटण तालुका युवक अध्यक्ष जनता क्रांती दल,मा. श्री .प्रभू कदम  इत्यादी तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा कराड तालुकाच्यावतीने चक्काजाम आंदोलन.

Image
भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा कराड तालुका यांचेकडून चक्काजाम आंदोलन. कराड /   प्रतिनिधी  भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा कराड तालुकाच्यावतीने कोल्हापुर नाका येथे चक्काजाम आंदोलन करुन रास्तारोको आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या चक्काजाम आंदोलन जिल्ह्यातील विविध भागांमध्ये केले जात आहे.  आज कराड उत्तर व दक्षिण तालुक्याच्यावतीने कराडच्या कोल्हापुर नाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी कराडच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा डाॅ. सारिका गावडे, सातारा जिल्हा सरचिटणीस महेंद्र डूबल, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रदेश सचिव सुदर्शन पाटस्कर,ओ.बी.सी.मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, उपाध्यक्ष भारत जंञे, युवा उपाध्यक्ष आण्णासो काशिद, मुकुंद चरेगावकर, घनश्याम पेंढारकर मलकापुर नगरसेवक भास्कर सोळवंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी पोलिस सहकार्‍यांसह आंदोलकांना  अडवण्याचा प्रयत्न करत आंदोलन कर्त्यांची धरपकड करुन अटक करुन शहर पोलिस ठाणे येथे आणून सुटका करण्यात आली. ...

दुष्काळ, महामारी आणि राजर्षी शाहूमहाराजांचा लढा.

Image
  दुष्काळ, महामारी आणि राजर्षी  शाहूमहाराजांचा लढा.                      ब्यूरो रीपोर्ट - भिमराव परघरमोल.                 भारतामध्ये पूर्वीपासूनच अवर्षण, दुष्काळ,  दैन्य, दारिद्र्य, दुखः,जातीव्यवस्था, गुलामी, गैरबराबरी व स्त्रीदास्य हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या सर्वांसाठी निसर्गाला जबाबदार धरून आपल्यावरील घोंगड अजिबात फेकता येणार नाही. निसर्ग जरी लहरीपणाची भूमिका पार पाडत असला, तरी मानवाने त्यामध्ये अमर्याद हस्तक्षेप केला आहे. अगदी आजच्या तारखेतील कोरोना विषाणू संदर्भात विचार करू गेलो, तर तो निसर्गनिर्मित आहे की, मानवनिर्मित याचा अजूनही स्पष्ट खुलासा झालेला नाही.                 आधुनिक काळामध्ये म्हणजे सन १८६० पासून ब्रिटीशांचे कंपनी राज्य संपुष्टात येऊन राणीचे राज्य अमलात आले तेव्हापासून, तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत काही अपवादात्मक वर्ष वगळली तर भारताला मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि महामारीने  पछाडले असल्याचे दिसून येते...

विश्वास मोहिते यांची 'मातंग आयोग किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळावर निवड करा.

Image
  विश्वास मोहिते यांची 'मातंग आयोग किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळावर निवड करा. 'समाजाच्या वतीने मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे निवेदन'. मुंबई  :  मातंग समाजच नव्हे तर बहुजन समाजातील पीडित, दलित, पददलित आणि वंचित घटकसाठी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन पाडळी (केसे ) ता. कराड येथील रहिवाशी, तिरंगा रक्षक चे संपादक, आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांची  'मातंग आयोग किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळावर निवड करा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील तमाम मातंग समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याकडे ई. मेल द्वारे केली आहे. मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, विश्वास मोहिते यांनी गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त काळ बीसी, ओबीसी, दलित, वंचित घटकातील लोकांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देणे, अन्याय अत्त्याचार विरोधी भूमिका घेणे, अपंग तसेच गोरगरिबांना आवश्यक त्या वेळी संस्थेच्या माध्यमातून मदत देणे अशा गोष्टी मध्ये ते सक्रिय असतात. त्यांनी स्वतःसाठी काहीही न करता समाज हेच ...

अत्यावश्यक नसलेली दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवण्यास परवानगी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी.

Image
  अत्यावश्यक नसलेली दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवण्यास परवानगी  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी. सातारा दि. 18 (जिमाका) : कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत असलेने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 19/06/2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.  आर्थिक, सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करण्यात येत आहेत.  सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात येत आह...

श्री समर्थ कृपा कृषी उद्योग ची सामाजिक बांधिलकीतुन 500 महिलांना परसबागेचे मोफत बियाणे वाटप .

Image
 श्री समर्थ कृपा कृषी उद्योग ची सामाजिक बांधिलकीतुन 500 महिलांना परसबागेचे मोफत  बियाणे वाटप . "कृषी योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा.. सातारा जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांचे प्रतिपादन." कार्वे:  प्रतिनिधी        महाराष्ट्र शासनाच्या कृषी  विभागाच्या  योजना  असून योजनाचा महिलांनी अभ्यास करून त्याचा लाभ घेऊन आपली आर्थिक परिस्थिती मध्ये बदल करावा असे प्रतिपादन सातारा  जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी केले. तसेच त्यांनी शासनाच्या अधिकृत दुकानातूनच शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी कराव्यात सेंद्रिय च्या नावाखाली जे बांधावर येऊन खते औषधे विक्री करतात ती शेतकऱ्यांनी खरेदी करू नयेत तसे होत असल्यास शासनाच्या निदर्शनास आणावे असेही आवाहन पवार यांनी केले.         शेनोली ता.कराड येथे श्री समर्थ कृपा कृषी उद्योग कडून उमेद महाराष्ट्र राज्य उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान च्या महिलांना शेती कार्यशाळा, परसबागेच्या महत्त्व व मोफत बियाणे वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विनायक पवार  बोलत होत...