श्री समर्थ कृपा कृषी उद्योग ची सामाजिक बांधिलकीतुन 500 महिलांना परसबागेचे मोफत बियाणे वाटप .

 श्री समर्थ कृपा कृषी उद्योग ची सामाजिक बांधिलकीतुन 500 महिलांना परसबागेचे मोफत  बियाणे वाटप .

"कृषी योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा.. सातारा जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांचे प्रतिपादन."

कार्वे:  प्रतिनिधी

       महाराष्ट्र शासनाच्या कृषी  विभागाच्या  योजना  असून योजनाचा महिलांनी अभ्यास करून त्याचा लाभ घेऊन आपली आर्थिक परिस्थिती मध्ये बदल करावा असे प्रतिपादन सातारा  जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी केले. तसेच त्यांनी शासनाच्या अधिकृत दुकानातूनच शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी कराव्यात सेंद्रिय च्या नावाखाली जे बांधावर येऊन खते औषधे विक्री करतात ती शेतकऱ्यांनी खरेदी करू नयेत तसे होत असल्यास शासनाच्या निदर्शनास आणावे असेही आवाहन पवार यांनी केले.

        शेनोली ता.कराड येथे श्री समर्थ कृपा कृषी उद्योग कडून उमेद महाराष्ट्र राज्य उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान च्या महिलांना शेती कार्यशाळा, परसबागेच्या महत्त्व व मोफत बियाणे वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विनायक पवार  बोलत होते. मंडल कृषी अधिकारी सैदापूर मा. विनायक कदम, कृषी पर्यवेक्षक विनोद  कदम,उमेद अभियान व्यवस्थापक कराड  पंचायत समितीचे निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

                 यावेळी विनायक कदम यांनी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या साठी किती उपयुक्त आहेत त्याबद्दलचे  सविस्तर माहिती देण्यात आली रोजगार हमी योजना फळबाग योजना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, शेतकऱ्यांच्या साठी विविध अवजारे कशा पद्धतीने दिली जातात व किती प्रमाणात अनुदान दिले जाते या सर्व योजनांची माहिती देण्यात आली.निलेश पवार यांनी आत्ता उमेद उमेद च्या वतीने तालुक्यामध्ये कशा पद्धतीने काम चालू आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती दिली महिलांच्या जीवनामध्ये आर्थिक बदल कसे होत गेले त्याबद्दल माहिती दिली व आता येणाऱ्या 15 जून ते 15 जुलै या कालावधीत परसबाग कशा पद्धतीने केली पाहिजे पंधराच्या गोल वर्तुळाकार पद्धतीमध्ये कोण कोणती भाजीपाला पिके घेतली पाहिजेत त्याबद्दल माहिती दिली.यावेळी श्री समर्थ कृपा कृषी उद्योग ची सामाजिक बांधिलकीतून बचत गटातील 500 महिलांना परस बागेची मोफत बियाणे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास सरपंच विक्रम कणसे उपसरपंच  संगीता माळी  चिन्मय वराडकर, सुशांत तोडकर शेनोली सावली ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ सुनंदा कणसे, चिन्मय वराडकर, सुशांत तोडकर सोनाली साळुंखे यांचे सह गावातील महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .