मंद्रुळकोळे ग्रामपंचायत येथे स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
मंद्रुळकोळे ग्रामपंचायत येथे स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
आज रविवार दिनांक ६ जून रोजी सकाळी ९:३० सुमारास पाटण तालुल्यातील मंद्रुळकोळे, (मंद्रुळकोळे खुर्द) ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. यावेळी स्वराज्यगुढी जवळ फुलांची सजावट करण्यात आली आणि मंद्रुळकोळे ग्रामपंचायत चे सरपंच अमोल पाटील यांनी शिवस्वराज्य दिनानिमित्त स्वराज्यगुढीचे पूजन केले. तर उपसरपंच पोपट कळत्रे यांनी सुद्धा स्वराज्यगुढीचे पूजन केले. शिवस्वराज्य सोहळ्यानिमित्त यावेळी कार्यक्रमाला पोलीस पाटील राजू लोहार, ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम पाटील,सर्जेराव पाटील, संतोष अवघडे, ग्रामपंचायत कर्मचारी यासह आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Comments
Post a Comment