उत्तम पाटील यांचे निधन.
उत्तम पाटील यांचे निधन.
कार्वे - प्रतिनिधी
कोडोली ता. कराड येथील उत्तम कृष्णा पाटील वय 44 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई एक भाऊ भावजय पुतण्या व मोठा मित्रपरिवार आहे. तसेच ते जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे ते सदस्य व कोडोली विकास सेवा सोसायटी चे माजी अध्यक्ष होते. त्यांनी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्वे गट कार्यालयात गट अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.तसेच कोरोनाच्या काळात त्यांनी महत्वपूर्ण सामाजिक कार्य केले आहे. तसेच ते राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमी सक्रिय असायचे .
रक्षा विसर्जन शुक्रवारी दिनांक 18/ 6 / 2021 रोजी सकाळी 10 : 00 वाजता कोडोली येथे होणार आहे.

Comments
Post a Comment