लोकहीतदक्ष राजा छत्रपती शाहू महाराज.

 लोकहीतदक्ष राजा छत्रपती शाहू     महाराज._________डॉ .बबन घोलप


शिराळा - प्रतिनिधि,

चिंचोली ता- शिराळा येथे   छत्रपती  शाहू महाराज जयंती साजरी झाली. यावेळी जेष्ठ समाजसेवक फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी बौद्ध धम्म अभ्यासक डॉ .बबन घोलप दादा हे शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त ऑनलाईन बोलत होते .

राजेशाहीत उपेक्षित वंचित बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले असा राजा होणे नाही डॉ . घोलप पुढे म्हणाले शाहू महाराजांच्या जयंती निमित्त  वनमोहत्सवाची सुरुवात केली आहे त्याचे संगोपन करू व त्या झाडांच्या मुळे स्वच्छ व चांगल्या पद्धतीने ऑक्सिजन व फळे मिळतील.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित लोंढे सर म्हणाले राधानगरी धरण बांधून  शाहू महाराजांनी हरीत क्रांती केली कला क्रीडा शिक्षण यासाठी विशेष भर दिला त्यांचे विचार प्रेरणादायी आहे. याबरोबरच सिध्दार्थ घोलप, मुलाणी सर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सरपंच फत्तेसिंग जाधव,  उपसरपंच सुरेश जाधव ,शिवाजी जाधव ,ग्रामपंचायत  सदस्य पै राहुल जाधव,मा. सरपंच अमर जाधव उपस्थित होते.

भिम शक्ती तरुण मंडळ यास पै .संदिप घोलप यांनी शाहू महाराज यांचा फोटो भेट दिला. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सुनिल घोलप यांनी केले आभार सुदर्शन सकटे यांनी मानले संयोजक पै. संदिप  घोलप, गणेश घोलप ,सिध्दार्थ घोलप, पांडुरंग घोलप ,संतोष घोलप , रुपेश सकटे, मोहन सकटे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .