जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साळशिरंबे येथे वृक्षारोपण.

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साळशिरंबे येथे वृक्षारोपण.

  "प्रज्ञा इंटरप्राईजेस यांच्या माध्यमातून साळशिरंबे येथे गावचे प्रथम नागरिक प्रमिला कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रमास प्रारंभ ."


उंडाळे - प्रतिनिधि,

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कराड येथील प्रज्ञा इंटरप्राईजेस माध्यमातून साळशिरंबे येथे गावचे प्रथम नागरिक प्रमिला कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.

     कराड येथील प्रज्ञा इंटरप्राईजेस ने एक लाख वृक्षारोपण त्याचे जतन व संगोपन असा संकल्प केला आहे. आज सर्वत्र वृक्षारोपण केले जाते परंतु त्याचे जतन व संगोपन या गोष्टीकडे दुर्लक्ष होते या गोष्टीकडे प्रज्ञा इंटरप्राईजेस ने लक्ष वेधून या उपक्रमांतर्गत साळशिरंबे येथे एक हजार वृक्षारोपणाचा उपक्रम राबविणार आहेत.

या वृक्षारोपण उपक्रमास प्रज्ञा इंटरप्राईजेस चे प्रतिनिधी आरती पवार( टेक्निकल डिपारमेंट) फेलोशिप प्रतीनिधी प्रा.संभाजी कदम उपस्थित होते. तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांचीही उपस्थिती होती.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .