भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा कराड तालुकाच्यावतीने चक्काजाम आंदोलन.
भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा कराड तालुका यांचेकडून चक्काजाम आंदोलन.
कराड / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा कराड तालुकाच्यावतीने कोल्हापुर नाका येथे चक्काजाम आंदोलन करुन रास्तारोको आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या चक्काजाम आंदोलन जिल्ह्यातील विविध भागांमध्ये केले जात आहे. आज कराड उत्तर व दक्षिण तालुक्याच्यावतीने कराडच्या कोल्हापुर नाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी कराडच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा डाॅ. सारिका गावडे, सातारा जिल्हा सरचिटणीस महेंद्र डूबल, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रदेश सचिव सुदर्शन पाटस्कर,ओ.बी.सी.मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, उपाध्यक्ष भारत जंञे, युवा उपाध्यक्ष आण्णासो काशिद, मुकुंद चरेगावकर, घनश्याम पेंढारकर मलकापुर नगरसेवक भास्कर सोळवंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी पोलिस सहकार्यांसह आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत आंदोलन कर्त्यांची धरपकड करुन अटक करुन शहर पोलिस ठाणे येथे आणून सुटका करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments
Post a Comment