अत्यावश्यक नसलेली दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवण्यास परवानगी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी.

 अत्यावश्यक नसलेली दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवण्यास परवानगी  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी.


सातारा दि. 18 (जिमाका) : कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत असलेने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 19/06/2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 आर्थिक, सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करण्यात येत आहेत.

 सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल.  

अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्रौ 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकाने,आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल,  सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .