विश्वास मोहिते यांची 'मातंग आयोग किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळावर निवड करा.

 विश्वास मोहिते यांची 'मातंग आयोग किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळावर निवड करा.

'समाजाच्या वतीने मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे निवेदन'.


मुंबई : मातंग समाजच नव्हे तर बहुजन समाजातील पीडित, दलित, पददलित आणि वंचित घटकसाठी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन पाडळी (केसे ) ता. कराड येथील रहिवाशी, तिरंगा रक्षक चे संपादक, आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांची  'मातंग आयोग किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळावर निवड करा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील तमाम मातंग समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याकडे ई. मेल द्वारे केली आहे.

मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, विश्वास मोहिते यांनी गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त काळ बीसी, ओबीसी, दलित, वंचित घटकातील लोकांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देणे, अन्याय अत्त्याचार विरोधी भूमिका घेणे,

अपंग तसेच गोरगरिबांना आवश्यक त्या वेळी संस्थेच्या माध्यमातून मदत देणे अशा गोष्टी मध्ये ते सक्रिय असतात. त्यांनी स्वतःसाठी काहीही न करता समाज हेच माझं घर म्हणून काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यांना सत्तेची चावी मिळाल्यास ते अधिक गतीने काम करतील याचा विचार करून मुख्यमंत्री महोदय आपण विश्वास मोहिते यांची 'मातंग आयोग किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळावर निवड कराच अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .