शेत रस्ता अडवणुक करण्याविरोधात कोठे दाद मागावी.

 शेत रस्ता अडवणुक करण्याविरोधात कोठे दाद मागावी.


 ब्यूरो  रीपोर्ट - गोंडवाना न्युज.

    शेतकऱ्यांना शेतात शेत कसण्यासाठी स्वतः किंवा मजुरांना निघून जावे लागते.  बी-बियाणे, खते किंवा शेतमालाची ने-आण करण्यासाठी बैलगाडी किंवा ट्रक्टर ची आवश्यकता भासते, परंतु मुजोर लोकाकडुन  त्याच्यामध्ये आडकाठी करत रस्ता अडवला जातो.

सबंधित शेतकरी तो रस्ता पुर्वीपार वापरत असेल तर, कोणालाही त्यास आडकाठी करता येत नाही. तहसिलदार कडे मामलेदार न्यायालयात अधिनियम १९०६ कलम ५ नुसार वादपत्र(अर्ज) करुन रस्ता अडविण्या-यास प्रतिवादी करुन दाखल करण्यात येवु शकतो.

  यामध्ये रस्ता अडवणुक केल्याची घटना, दिनांक , वेळ लिहुन या घटनेचे साक्षीदार असल्यास त्यांची नावे नमुद करण्यात येवु शकतात. अर्जाबरोबर सत्यापन करण्यासाठी योग्य ती तिकिट व दोन्ही शेताचे सातबारा , तलाठ्याकडुन कच्चा नकाशा जोडावा. असल्यास साक्षीदार ची नावे द्यावीत हा अर्ज संबंधीताने रस्ता अडवल्याच्या ६ महिन्यांच्या मुदतीत करावा. 

अडवण्यात आलेला रस्ता हा जुना असुन तो अडवु नये या साठी तहसीलदारांना मामलेदार न्यायालयात कायदा १९०६ कलम ५ नुसार शेतकऱ्यांना रस्ता पुर्वरत करण्याचा अधिकार आहे.

तसेच जुना रस्ता नसल्यास जमिल महसुल कायदा कलम १४३ नुसार कोणत्याही शेतकऱ्यांना जमिन कसण्यासाठी तशी मागणी करण्याचा अधिकार असतो. तशी मागणी तहसीलदारांना करावी लागते.

वहिवाट कायदा १९८२ कलम १५ नुसार २० वर्षाहुन अधिक काळ एखादा रस्ता मग तो शेतात जाणारा असो वा घरचा रस्ता असो त्या रस्तावरुन येण्या-जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्यास अडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधीतांवर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो.

रहदारीच्या रस्त्यावरुन जाताना अडवणुक केल्यास भा.द. वि  कलम ३४१ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. रस्ता अडवणुकीबद्दल तहसिलदार न्यायालयात वरील तरतुदी नुसार येतो किंवा दिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया आर्डर ३९ रुल १व२ नुसार तात्पुरत्या मनाई साठी अर्ज व निरंतर मनाई साठी दावा करण्यात येवु शकतो.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .