Posts

ग्रामपंचायत चिंचोली व जि.प.शाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

Image
  ग्रामपंचायत चिंचोली व जि.प.शाळा येथे प्रजासत्ताक दिन  साजरा. शिराळा - प्रतिनिधी. ग्रामपंचायत चिंचोली व जि प शाळा येथे प्रजासत्ताक दिन  साजरा करण्यात आला.  सरपंच सौ कविता पाटील व मुख्य ध्यापिका सौ मंदाकिनी मोरे यांनी ध्वजारोहण केले  या कार्यक्रमासाठी  माजी सरपंच पै.संपतराव जाधव, उपसरपंच सौ. रूपाली जाधव, माजी सरपंच पै. शरद जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनिल जाधव, रणजित पाटील, पै.धनाजी जाधव, सौ.प्रियांका जाधव, पोलिस पाटील मा.भरत चव्हाण, पै.उत्तम पाटील, विजय पाटील,वैभव पाटील, आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. ज्ञान मंदिर अभ्यासिका व वाचनालयाचे संस्थापक माजी सैनिक संभाजी जाधव यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शालेय साहित्य वाटप केले. स्वागत सावंत सर यांनी केले विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले आभार ग्रामविकास अधिकारी मा पी एम पाटील यांनी मानले.

जिल्हा परिषद केंद्र शाळा येवती येथील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Image
  जिल्हा परिषद केंद्र शाळा येवती येथील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.  कराड -प्रतिनिधी. जिल्हा परिषद केंद्र शाळा येवती येथील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. येवती ता. कराड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये प्रजासत्ता दिन उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे संघटक पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच सागर शेवाळे ,मुख्याध्यापक राजाराम कारंडे ,उपशिक्षक मारुती कांबळे ,अश्विनी ढेरे ,विकास देसाई, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर सोरटे, माजी उपसरपंच सविनय सोरटे, आदी उपस्थित होते .यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेले लेझीम पथक आकर्षण ठरले .या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा संपन्न.

Image
  शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा संपन्न. कराड -प्रतिनिधी. शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा  राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोशारी  यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. येवती  ता .कराड येथील शिवतेज सामाजिक विकास संस्था गेल्या अनेक वर्षापासून येवती येथे कार्यरत आहे आणि याच शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या कॅलेंडरचे प्रकाशन महामहिम राज्यपाल भगतसिंग कोसारी यांच्या शुभहस्ते मुंबई येथे राजभवन मध्ये  मंगळवार दिनांक 24 रोजी उत्साहात पार पडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकर शेवाळे ,पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे ,चंद्रभागा रुलर  डेव्हलपरचे चेअरमन दीपक लोखंडे, पत्रकार संघाचे नितीन मोरे ,अतुल काकडे, धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप ,संजू पाटील , अनिज भालदार   प्रताप भणगे, विलास शेवाळे, आदी उपस्थित होते.

कृषिदूतांमार्फत मृदा आरोग्य कार्ड चे प्रात्यक्षिक संपन्न.

Image
  कृषिदूतांमार्फत मृदा आरोग्य कार्ड चे प्रात्यक्षिक संपन्न. कराड-प्रतिनिधी.  जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुक येथे कृषिदूतांनी मृदा आरोग्य कार्ड या  प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. यावेळी मृदा आरोग्य कार्ड याच्या फायद्यांविषयी माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिकाचे आयोजन ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिकता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत करण्यात आले.  या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अभ्यास करून मृदा आरोग्य कार्ड प्रदान करणे. जेणेकरुन शेतकरी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शेती करू शकेल. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या आरोग्यानुसार पिके लावण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. मृदा आरोग्य कार्ड योजना 2022 मातीच्या गुणवत्तेनुसार पीक लावून पिकाची उत्पादक क्षमता वाढवेल, जेणेकरुन शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल आणि खतांचा उपयोग मातीचा आधार व समतोल वाढविण्याचे उद्दीष्ट आहे. शेतक्यांना कमी किंमतीत अधिक उत्पादन मिळू शकेल. ही सर्व माहिती कृषिदूतांनी ग्रामस्थांना पटवून दिली.. कृषिदूत अवधूत वसव, तेजस प्रधान, अविराज पाटील,...

मोदींच्या मुळे भारताचा विकास गतिमान झाला : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा.

Image
  मोदींच्या मुळे भारताचा विकास गतिमान झाला :  केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा.     येवती येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप.                   उंडाळे : प्रतिनिधी.     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आज संपूर्ण जग त्यांचा सन्मान करत आहे.   युक्रेन सारख्या देशांमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना सही सलमत आणण्याचे काम आदरणीय प्रंतप्रधान मोदी यांनी केले.  नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगाचे  नेतृत्व करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय  मिश्रा यांनी केले. जल जीवन मिशन अंतर्गत  येवती  ता. कराड येथे सुरू करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले, यावेळी भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, माजी आमदार प्रमोद जठार, बाजार समिती समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, भाजपच...

वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत : डॉ. सुरेश भोसले.

Image
  वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत : डॉ. सुरेश भोसले.                                                          कराड-प्रतिनिधी.   वाहन चालक मोठ्या जबाबदारीचे काम करत असतात. अपघात टाळण्यासाठी त्यांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांनी केले.  यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर 34 व्या रस्ता सुरक्षा अभियान अर्तंगत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कराड, महामार्ग पोलीस कराड व कृष्णा कारखान्याच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक शिरीष पोकळे, मोटार वाहन निरीक्षक श्रीमती तृप्ती पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ कळके,  सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार, कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, अविनाश खरात, विलास भंडारे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील, से...

दिशा शेखनी मांडले तृतीयपंथीयांचे वास्तव

Image
  दिशा शेखनी मांडले तृतीयपंथीयांचे वास्तव  बलशाली युवा हदय संमेलनात तरुणाईशी साधला मनमोकळा संवाद.  कराड ः प्रतिनिधी. घारेवाडी (ता. कराड) येथील शिवम्ं प्रतिष्ठानच्यावतीने आयोजीत २२ व्या युवा हृदय संमेलनात हसरं दुख--भिडणारं या विषयावर सामाजीक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. प्रतिष्ठानचे संस्थापक सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष महेश मोहिते, सचिव प्रताप भोसले, अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. सुशांत मोहिते, डॉ.अशोक सावंत, दिपक अरबुणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दिशा शेख म्हणाल्या, डार्विनचा सिध्दांत मी मानते. पृथ्वीची निर्मीती विज्ञानाने झाली मला मान्य आहे. हेमोसेशियन नुसार मात्र मानव हा एक प्राणी आहे. स्त्री-पुरषाला लिंगाधारित विषमता मला मान्य नाही. पुरूष पुरूष आहे. स्त्री स्त्री आहे. मग आम्हाला तिसरा ठरवणारे तुम्ही कोण ? समाजात आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. आमचे दुःख कुणी समजून घेत नाही. हे दुःख माणसाचे आहे. हे तुम्ही समजून घ्यायला हवे. निश्चित ते मना...