मोदींच्या मुळे भारताचा विकास गतिमान झाला : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा.

 मोदींच्या मुळे भारताचा विकास गतिमान झाला :  केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा.  

 येवती येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप.              

   उंडाळे : प्रतिनिधी. 

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आज संपूर्ण जग त्यांचा सन्मान करत आहे.   युक्रेन सारख्या देशांमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना सही सलमत आणण्याचे काम आदरणीय प्रंतप्रधान मोदी यांनी केले.  नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगाचे  नेतृत्व करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय  मिश्रा यांनी केले. जल जीवन मिशन अंतर्गत  येवती  ता. कराड येथे सुरू करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले, यावेळी भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, माजी आमदार प्रमोद जठार, बाजार समिती समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, कृष्णा कारखान्याच्या संचालक दयानंद पाटील, सरपंच सागर शेवाळे आदी उपस्थित होते, नामदार मिश्रा म्हणाले , राहुल गांधी सारखे लोक नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आपला वेळ वाया घालवत आहे. नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वाखाली होत असलेली भारताची प्रगती राहुल गांधी यांना पहावत नसल्याचे टीका त्यांनी यावेळी केली. केंद्राच्या 1 कोटी 38 लाखांच्या निधीतून जल जीवन मिशन अंतर्गत येवती येथील पाणीपुरवठा योजना साकारले जात आहे .केंद्रातील भाजप तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणचे विकासासाठी भरघोस निधी देण्याची ग्वाही  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. येत्या काळात सांगाल ती योजना कराड दक्षिण मध्ये आणण्याचे काम भाजप करणार असल्याची ग्वाही डॉ. अतुल भोसले यांनी दिली. मारुती शेवाळे यांनी स्वागत केले तर आभार सरपंच सागर शेवाळे यांनी मानले  यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस शिंदे, उप अभियंता सुनील बसुगडे ,दीपक लोखंडे, अमोल शेवाळे, हणमंतवाडी ग्रामपंचायतच्या विद्यामान सदस्या सीमा मोरे  आदी उपस्थित होते .

    

  मोदींमुळे लोकांच्या जीवनात परिवर्तन .   

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हे ध्येय ठेवून त्यासाठी अनेक योजना सुरू केल्या या लोकोपयोगी  योजनामुळे गेल्या आठ वर्षात मोदींनी लोकांच्या जीवनात सकारात्मक प्रतिवर्तन घडवून आणलेले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा म्हणाले .


येवती येथील शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री आजय मिश्रा व भा.ज.पा. सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले(बाबा) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी चंद्रभागा रुरल डेव्लपरचे दिपक लोखंडे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .