कृषिदूतांमार्फत मृदा आरोग्य कार्ड चे प्रात्यक्षिक संपन्न.

 

कृषिदूतांमार्फत मृदा आरोग्य कार्ड चे प्रात्यक्षिक संपन्न.

कराड-प्रतिनिधी.

 जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुक येथे कृषिदूतांनी मृदा आरोग्य कार्ड या  प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. यावेळी मृदा आरोग्य कार्ड याच्या फायद्यांविषयी माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिकाचे आयोजन ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिकता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत करण्यात आले.  या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अभ्यास करून मृदा आरोग्य कार्ड प्रदान करणे. जेणेकरुन शेतकरी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शेती करू शकेल. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या आरोग्यानुसार पिके लावण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. मृदा आरोग्य कार्ड योजना 2022 मातीच्या गुणवत्तेनुसार पीक लावून पिकाची उत्पादक क्षमता वाढवेल, जेणेकरुन शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल आणि खतांचा उपयोग मातीचा आधार व समतोल वाढविण्याचे उद्दीष्ट आहे. शेतक्यांना कमी किंमतीत अधिक उत्पादन मिळू शकेल. ही सर्व माहिती कृषिदूतांनी ग्रामस्थांना पटवून दिली.. कृषिदूत अवधूत वसव, तेजस प्रधान, अविराज पाटील, रोहित पवार , ऋषिकेश पवार, प्रथमेश पाटील,ऋतुराज पाटील यांनी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. प्राचार्य डॉ. भास्कर जाधव, प्रा. गजानन मोहिते, प्रा. दीपक भिलवडे, प्रो. अमोल अडके यांचे कृषिदूतांना मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .