दिशा शेखनी मांडले तृतीयपंथीयांचे वास्तव

 दिशा शेखनी मांडले तृतीयपंथीयांचे वास्तव 

बलशाली युवा हदय संमेलनात तरुणाईशी साधला मनमोकळा संवाद. 


कराड ः प्रतिनिधी.
घारेवाडी (ता. कराड) येथील शिवम्ं प्रतिष्ठानच्यावतीने आयोजीत २२ व्या युवा हृदय संमेलनात हसरं दुख--भिडणारं या विषयावर सामाजीक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. प्रतिष्ठानचे संस्थापक सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष महेश मोहिते, सचिव प्रताप भोसले, अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. सुशांत मोहिते, डॉ.अशोक सावंत, दिपक अरबुणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दिशा शेख म्हणाल्या, डार्विनचा सिध्दांत मी मानते. पृथ्वीची निर्मीती विज्ञानाने झाली मला मान्य आहे. हेमोसेशियन नुसार मात्र मानव हा एक प्राणी आहे. स्त्री-पुरषाला लिंगाधारित विषमता मला मान्य नाही. पुरूष पुरूष आहे. स्त्री स्त्री आहे. मग आम्हाला तिसरा ठरवणारे तुम्ही कोण ? समाजात आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. आमचे दुःख कुणी समजून घेत नाही. हे दुःख माणसाचे आहे. हे तुम्ही समजून घ्यायला हवे. निश्चित ते मनाला अणि काळजाला भिडणारं आहे. भीक मागताना आम्हाला आत्मसन्मान मारावा लागतो. मात्र भिकेपोटी तुम्ही दिलेल्या दहा रूपयापेक्षा आमचा आत्मसन्मान नक्कीच मोठा आहे. समाजात जाती व्यवस्था, चातुरवर्ण व्यवस्था आहे. त्यातुन नैतिक अस्पृश्यता, अनैतिक अस्पृश्यता निर्माण झाली. ती कुणी निर्माण केली ? खरा भारत पाहयचा असेल तर तुम्ही माझ्या श्रीरामपुरच्या तृतीयपंथी अश्रमाला भेट जरूर द्या. माणसांन माणसाशी कस राहयंच हीच शिकवण तुम्हाला त्याठिकाणी मिळेल. तुमची सुधारणा ही तुमच्या मानसिकेतवर अवलंबून आहे. माझे नाव दिशा पिंकी शेख कसे तुम्हाला प्रश्न पडला असेल मात्र मी वडीलाच्या जागी माझ्या गुरूचे नाव दिले आहे. ज्यांनी माझा सांभाळ केला. त्या गुरूंना आणि माझ्या मित्रांना मी कधीच विसरू शकत नाही. तत्पुर्वी सुप्रसिध्द लेखिका विणा गवाणकर यांनी मुलाखतीतून युवक-युवतीसी संवाद साधला. स्वाती गोडसे यांनी मुलाखत घेतली. विठ्ठल मोहिते यांनी सुत्रसंचालन केले. विजयालक्ष्मी शेट्टी व सुनिता गरूड यांनी स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .