माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती विसरून चालणार नाही:-किरण पाटील.

 माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती विसरून चालणार नाही:-किरण पाटील.


 कराड:-नांदलापूर ता.कराड येथील सुखशांती वाचनालयास शासकीय ग्रंथालयाचे तांत्रिक सहाय्यक अधिकारी किरण पाटील यांची सदिच्छा भेट, यावेळी सरपंच मानसिंगराव लावंड आप्पा यांनी किरण पाटील साहेब यांचे शाळ,श्रीफळ व ग्रंथ देऊन सन्मान केला. या सदिच्छा भेटी प्रसंगी किरण पाटील बोलताना म्हणाले आज मितीला विचार करता पालकवर्ग आणि शिक्षक यांची जागृता किती आहे. ही चिंतनीय बाब आहे. अध्ययन व ज्ञानग्रहणासाठी वाचन हे प्रभावशाली व अतिशय महत्त्वाचे कौशल्य आहे. बदलत्या महाभयानक परिस्थितीत व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन हेच विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. शासनाने आताच ६०% अनुदान वाढ देऊन ग्रंथालये सक्षम करण्याचे धोरण आखलेले आहे. लवकरच दर्जा बदल करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आपणही आपले ग्रंथालय लोकसभागातून वाचकांना घरापर्यंत वाचनीय साहित्य देऊ शकेल हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

यावेळी सरपंच मानसिंग आप्पा मुख्याध्यापक दादासो शेडगे सर प्रदीप काकडे ग्रंथपाल स्नेहल निकम, संचालिका संगीता सावंत,यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सचिव दत्तात्रय कुंभार,अरुणा सावंत,निलम शिर्के मॅडम, प्रकाश शिर्के,पोलीस पाटील जयवंत शिर्के उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर शिर्के सर यांनी केले तर आभार विश्वासराव निकम यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .