शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भव्य सत्संग मेळावा संपन्न.
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भव्य सत्संग मेळावा संपन्न.
क्रांतीदूत युवा संत चंद्रकांत दादासाहेब मोरे यांचे कराडकरांना लाभले अमृतमय मार्गदर्शन.
कराड - प्रतिनिधी.
कराड येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या विद्यमाने दिंडोरी प्रणित वाकाण स्वामी सेवा केंद्राच्या वतीने शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भव्य सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीदूत युवासंत आदरणीय चंद्रकांत दादासाहेब मोरे यांचे अमृतमय हितगुज व मार्गदर्शन केले. त्यांनी मराठी अस्मिता, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, बालसंस्कार, युवा प्रबोधन, शेतीशास्त्र, ग्राम अभियान अशा विविध विषयावर अमृतमय मोलाचे मार्गदर्शन केले.
या मेळाव्यास सुमारे दहा हजारहुन अधिक सेवेकरांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन आणि हितगुजाचा सेवेकरांनी लाभ घेतला.
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये २० टक्के अध्यात्म व ८० टक्के सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू गरिबांना, महिला भगिनींना महावस्त्रदान तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तू दान करण्यात आल्या. या भव्य सत्संगामध्ये गरजू गरिबांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध कौटुंबिक व्यावसायिक अडी अडचणीवर मार्गदर्शन करण्यात आले.
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या संख्येने उपस्थित महिला भगिनींनी श्री यंत्रावर कुंकुमार्चन व श्री दुर्गा सप्तशती पाठ आई भगवतीच्या चरणी सेवा रुजू केली. सर्व परिसरात चैतन्यमय उत्साहामय,आनंदमय वातावरणात भव्य आध्यात्मिक सत्संगामध्ये क्रांतीदूत युवासंत आदरणीय चंद्रकांत दादासाहेब मोरे यांनी सामाजिक प्रबोधन केले.
वाकण सेवा केंद्रामध्ये दैनंदिन आरती सकाळी 8 वाजता, सकाळी 10.30 वाजता, सायंकाळी 6 वाजता असते. तसेच विनामूल्य सामाजिक, आर्थिक, मानसिक समस्यावर मार्गदर्शन केले जाते. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी सेवा केंद्र दिंडोरी प्रणित वाखान दरबार वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 8625098333 / 9146146555

Comments
Post a Comment