वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत : डॉ. सुरेश भोसले.

 

वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत : डॉ. सुरेश भोसले.

                                                        

कराड-प्रतिनिधी.

  वाहन चालक मोठ्या जबाबदारीचे काम करत असतात. अपघात टाळण्यासाठी त्यांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांनी केले. 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर 34 व्या रस्ता सुरक्षा अभियान अर्तंगत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कराड, महामार्ग पोलीस कराड व कृष्णा कारखान्याच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक शिरीष पोकळे, मोटार वाहन निरीक्षक श्रीमती तृप्ती पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ कळके,  सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार, कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, अविनाश खरात, विलास भंडारे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील, सेक्रेटरी मुकेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोटार वाहन निरीक्षक तृप्ती पाटील यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. भारतात दरवर्षी जास्त लोक रस्ते अपघातात मरण पावत असल्याची माहिती दिली.  कोरोनामध्ये जेवढी जीवितहानी झाली नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त जीवीतहानी रस्ते अपघातातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार म्हणाले, नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून रस्ता सुरक्षा अभियान साजरे करण्यात येत आहे.  तसेच वाहनांचा वेग ठरवून दिला आहे. अतिवेगाचा वापर करू नये. वाहनचालकांनी व्यसन करू नये, वाहन चालवताना मोठ मोठ्याने गाणी लावू नयेत. ओव्हरलोड वाहने चालवू नये या सारख्या गोष्टी लक्षात घेवून अपघात रोखता येतील.  

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक महेश पाटील म्हणाले, नागरिकांनी रस्त्यावर चालताना नेहमी उजव्या बाजूने चालावे म्हणजे सतर्क राहता येऊ शकते. नागरिकांनी सावधगिरी बाळगून वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे.

यावेळी ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना मान्यवरांच्या हस्ते रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच ऊस वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वाहनचालकांना रस्ता सुरक्षिततेची शपथ देण्यात आली.

मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, वाहतूक को- ऑर्डीनेटर गजानन प्रभुणे, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, कामगार कल्याण अधिकारी अरुण पाटील, सिव्हिल को- ऑर्डीनेटर दादासो कुंभार, संरक्षण अधिकारी संजय नलवडे ,  स्टोअर ऑफिसर जी.बी.मोहिते, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस हवालदार मधुकर पवार आदीसह ऊस वाहतुक करणारे वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सेक्रेटरी मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी आभार मानले.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .